महाराष्ट्रात 'या' ठिकाणी शूट झाला DDLJ मधील आयकॉनिक सीन, अनुपम खेर सरकारला विनंती करत म्हणाले "पर्यटनस्थळ' म्हणून विकसित करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:01 IST2026-05-12T14:28:47+5:302026-05-12T15:01:36+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' सिनेमा म्हणून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ओळखला जातो.

Anupam Kher Ddlj Shooting Location Apta Railway Station Maharashtra Tourism | महाराष्ट्रात 'या' ठिकाणी शूट झाला DDLJ मधील आयकॉनिक सीन, अनुपम खेर सरकारला विनंती करत म्हणाले "पर्यटनस्थळ' म्हणून विकसित करा"

महाराष्ट्रात 'या' ठिकाणी शूट झाला DDLJ मधील आयकॉनिक सीन, अनुपम खेर सरकारला विनंती करत म्हणाले "पर्यटनस्थळ' म्हणून विकसित करा"

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' सिनेमा म्हणून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ओळखला जातो. या चित्रपटातील प्रत्येक डॉयलॉग आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. मात्र, चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेवटचा 'ट्रेन सीन'. आता याच सीनशी संबंधित महाराष्ट्रातील एका रेल्वे स्थानकाचा व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केला. तसेच या ठिकाणाला 'पर्यटनस्थळ' म्हणून विकसित करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 'आपटा' (Apta Railway Station) हे रेल्वे स्थानक दिसत आहे. ३१ वर्षांपूर्वी याच स्टेशनवर अमरीश पुरी यांनी काजोलचा हात सोडत "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" हा अजरामर डायलॉग म्हटला होता. योगायोगाने, अनुपम खेर एका दुसऱ्या प्रकल्पाच्या शूटिंगसाठी पुन्हा एकदा आपटा स्टेशनवर पोहोचले. तिथले वातावरण पाहून ते भावूक झाले. 

अनुपम यांनी आठवणींना उजाळा देत म्हटलं, "३१ वर्षांनंतर पुन्हा याच ठिकाणी येणं खूपच भावनिक होतं. आम्ही जेव्हा हा सीन शूट करत होतो, तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की हा क्षण भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक सीन बनेल. पण आयुष्याची खरी सुंदरता कदाचित यातच आहे की, एखाद्या क्षणाचं मोठेपण आपल्याला खूप उशिरा जाणवतं".


सरकारला केली 'ही' महत्त्वाची विनंती

अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना महाराष्ट्र सरकारला एक कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले की, "आपटा रेल्वे स्थानक या ठिकाणाला 'पर्यटनस्थळ' म्हणून विकसित करण्यात यावे". जगभरात ज्या ठिकाणी मोठ्या चित्रपटांचे शूटिंग होते, त्या जागांचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व जपले जाते. भारतातही सिनेमाशी जोडलेल्या अशा ऐतिहासिक ठिकाणांचे जतन होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.

Web Title : अनुपम खेर ने महाराष्ट्र सरकार से DDLJ के आइकोनिक सीन की जगह को विकसित करने का अनुरोध किया।

Web Summary : अनुपम खेर ने आप्टा स्टेशन का दौरा किया, जहाँ DDLJ का आइकोनिक सीन फिल्माया गया था। अभिभूत होकर, उन्होंने महाराष्ट्र सरकार से इसे एक पर्यटन स्थल के रूप में विकसित करने, इसके सिनेमाई इतिहास और भावनात्मक मूल्य को संरक्षित करने का आग्रह किया।

Web Title : Anupam Kher requests Maharashtra govt to develop DDLJ iconic scene location.

Web Summary : Anupam Kher revisited Apta station, where DDLJ's iconic scene was filmed. Overwhelmed, he urged the Maharashtra government to develop it into a tourist spot, preserving its cinematic history and emotional value.