विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:58 IST2025-07-02T11:55:18+5:302025-07-02T11:58:34+5:30
अनिल कपूरने एअर इंडियामधून प्रवास केला आहे. या प्रवासावेळी आलेला अनुभव अनिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे

विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक
काही दिवसांपूर्वी घडलेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला. एअर इंडियाचं विमान या दुर्घटनेत क्रॅश झालं. त्यामुळे अनेक कारणांनी एअर इंडिया सध्या चर्चेत आहे. या दुर्घटनेनंतर अनिल कपूरने एअर इंडियातून प्रवास केला आहे. अनिल कपूरने या प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय एअर इंडियाच्या स्टाफने अनिलला कशी वागणूक दिली, याचाही खुलासा केला आहे. अनिलचा एअर इंडिया प्रवासाचा अनुभव आनंददायी राहिला आहे.
असा होता अनिल यांचा एअर इंडियाचा अनुभव
अनिल कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एअर इंडिया प्रवासाचा सुखद अनुभव शेअर केला आहे. यावेळी अनिलने केबिन क्रूसोबत फोटो शेअर केला आहे. अनिलने सर्वांसोबत एक सेल्फी काढला आहे. याशिवाय एका फोटोमध्ये अनिलने हातामध्ये एक कागदाची नोट पकडली आहे. ही नोट त्याला एअर इंडियाच्या स्फाटने दिली आहे. "आमचे प्रिय बॉलिवूड नायक, आज तुम्हाला आमच्या फ्लाईटमध्ये बघून आम्हाला खूप आनंद झाला. तुमचा आजवरचा प्रवास, काम आणि सिनेमाबद्दल असलेलं तुमचं योगदान खूप कौतुकास्पद आहे. आम्ही तुम्हाला सुरक्षित यात्रेच्या शुभेच्छा देतो. असेच झक्कास राहा.", असा संदेश त्या चिठ्ठीवर असलेला दिसतो.
अनिल कपूर यांचा आगामी सिनेमा
अनिल कपूर सध्या बॉलिवूडमधील विविध सिनेमांमध्ये कार्यरत आहेत. अनिल यांनी २०२३ च्या डिसेंबर महिन्यात आलेल्या 'अॅनिमल' सिनेमात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली. ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर अनिल यांनी 'सावी' या सिनेमात काम केलं. सध्या अनिलच्या आगामी 'सुभेदार' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अनिल निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची पहिली झलक भेटीला आली होती.