अमरिश पुरी यांच्या कुटुंबियांचा हा जुना फोटो होता व्हायरल, पत्नी दिसायची खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 07:32 PM2021-06-30T19:32:44+5:302021-06-30T19:33:24+5:30

अमरिश पुरी विमा कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच त्यांनी लग्न केले.

amrish puri wife picture | अमरिश पुरी यांच्या कुटुंबियांचा हा जुना फोटो होता व्हायरल, पत्नी दिसायची खूपच सुंदर

अमरिश पुरी यांच्या कुटुंबियांचा हा जुना फोटो होता व्हायरल, पत्नी दिसायची खूपच सुंदर

googlenewsNext
ठळक मुद्देअमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले.

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील.

अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले होते. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली. पण विमा कंपनीत काम करत असताना त्यांच्या आयुष्यात एक खूपच चांगली गोष्ट घडली. इथेच त्यांच्या पत्नीची आणि त्यांची ओळख झाली.

अमरिश पुरी विमा कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच त्यांनी ५ जानेवारी १९५७ ला लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचे नाव नम्रता आहे. नम्रता ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. तर त्यांचा मुलगा राजीव हा बिझनेसमन आहे.

Web Title: amrish puri wife picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.