शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:09 IST2025-12-21T13:04:36+5:302025-12-21T13:09:32+5:30
'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्नाचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. शूटिंग करताना अक्षयला एका गोष्टीचा त्रास होतो. काय आहे ती गोष्ट?

शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयातील सातत्य आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या व्यावसायिक आयुष्यातील अशा एका गोष्टीचा खुलासा केला आहे, जी त्याला अजिबात आवडत नाही. शूटिंग करताना अक्षयला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो?
अक्षय खन्नाच्या मते, तो एक असा व्यक्ती आहे ज्याला शिस्तबद्ध आयुष्य जगायला आवडते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी काम करणे त्याच्या स्वभावात बसत नाही.'वाइल्ड फिल्म्स इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अक्षय म्हणाला, "रात्री शूटिंग करणं माझ्यासाठी एखाद्या शिक्षेसारखे असते. मला ते अजिबात सहन होत नाही. रात्रीच्या वेळी काम केल्याने शरीराचे आणि झोपण्याचे चक्र पूर्णपणे बिघडून जाते."
अक्षयने पुढे सांगितले की, जरी त्याला नाईट शूट आवडत नसले, तरी एक अभिनेता म्हणून त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. तो म्हणाला, "कथेत जर रात्रीचे दृश्य असेल, तर ते रात्रीच शूट करावे लागते. तेव्हा माझ्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय नसतो. ही माझ्या कामातील सर्वात वाईट बाजू आहे, जी मला नाइलाजाने स्वीकारावी लागते."
अक्षयच्या मते, जरी नाईट शूट त्रासदायक असले, तरी पडद्यावर जेव्हा शूटिंग केलेला सीन उत्तम दिसतो, तेव्हा तो त्रास विसरायला होतो. 'धुरंधर' चित्रपटाच्या वेळीही अक्षयला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, पण त्याने संपूर्ण समर्पण भावनेने 'धुरंधर' सिनेमातील रहमान डकैतची भूमिका साकारली. 'बॉर्डर', 'ताल', 'दिल चाहता है' आणि 'इत्तेफाक' सारख्या चित्रपटांमधून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.