घोड्यावर 'खिलाडी' तर बुलेटवर येतोय 'संजू', अक्षय कुमारने शेअर केला 'वेलकम टू जंगल'चा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 14:57 IST2023-12-21T14:57:01+5:302023-12-21T14:57:47+5:30
अक्षय घोड्यावर तर मागे संजू बाबा बाईकवर एन्ट्री घेताना दिसत आहेत.

घोड्यावर 'खिलाडी' तर बुलेटवर येतोय 'संजू', अक्षय कुमारने शेअर केला 'वेलकम टू जंगल'चा व्हिडिओ
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आगामी 'वेलकम टू जंगल' (Welcome To Jungle) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा 'वेलकम'चा तिसरा पार्ट आहे. तर दुसरीकडे आजच 'वेलकम' सिनेमाला १६ वर्ष पू्र्ण झाली आहेत. या निमित्ताने अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर सेटवरचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तो घोड्यावरुन येताना दिसतोय तर मागून संजय दत्त बुलेटवरुन येत आहे.
अक्षय कुमार 'वेलकम टू जंगल' शूटिंगचे अनेक अपडेट्स सोशल मीडियावर देत असतो. सेटवर काय काय धमाल सुरु असते याची झलक तो दाखवतो. त्याने आज शेअर केलेला व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीस पडलाय. सिनेमाबद्दल चाहत्यांना आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. या व्हिडिओत अक्षय घोड्यावर तर मागे संजू बाबा बाईकवर एन्ट्री घेताना दिसत आहेत. अक्षयने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले,'काय छान योगायोग आहे की आज वेलकमच्या रिलीजला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर इथे मी तिसऱ्या भागाची शूटिंग करत आहे. आणि संजू बाबाचं स्वागत करायलाही आनंद होतोय. तुम्हाला काय वाटतं?'
'वेलकम टू जंगल' मध्ये अक्षय कुमारसोबतच संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी,परेश रावल, जॉनी लिवर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, दिशा पाटनी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.