Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 14:31 IST2021-11-15T14:30:21+5:302021-11-15T14:31:07+5:30
Prithviraj: अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.

Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (akshay kumar) बहुप्रतिक्षीत ठरलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. यामध्येच आता त्याच्या आगामी 'पृथ्वीराज' (prithviraj) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, विशेष म्हणजे हा टीझर पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत असल्याचं सांगण्यात येत आहे.
अक्षयचा पृथ्वीराज हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे तिचा हा डेब्यु चित्रपट आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये या चित्रपटातील पात्रांची ओळख करुन देण्यात आली आहे. सोबतच युद्धभूमीदेखील दाखवण्यात आली आहे. यात अक्षय कुमार, संजय दत्त आणि युद्धभूमीवर लढाईसाठी सज्ज असलेले योद्धे दिसून येत आहेत.तसंच 'धर्मासाठी जगलोय आणि धर्मासाठीच मरण पत्करेन', असं अक्षय कुमार या टीझरच्या शेवटी म्हणतांना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २१ जानेवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. तसंच अक्षयसोबत सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानुषी छिल्लर ही तगडी स्टार कास्ट झळकणार आहे.