अजय देवगणच्या 'मैदान' ची तारीख पे तारीख, रिलीज डेटचा मुहुर्तच ठरेना; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:41 PM2023-06-07T13:41:34+5:302023-06-07T13:42:50+5:30

अजय देवगणच्या 'मैदान' ला तारीख मिळेना!

Ajay's Devgan next movie Maidan release postponed 7th time what is the reason | अजय देवगणच्या 'मैदान' ची तारीख पे तारीख, रिलीज डेटचा मुहुर्तच ठरेना; काय आहे कारण?

अजय देवगणच्या 'मैदान' ची तारीख पे तारीख, रिलीज डेटचा मुहुर्तच ठरेना; काय आहे कारण?

googlenewsNext

'बधाई हो' फेम दिग्दर्शक रवींद्रनाथ शर्मा यांची फिल्म 'मैदान' (Maidan) बरेच दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात येत आहे. आता तर सातव्यांदा रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. २३ जून रोजी मैदान प्रदर्शित होणार असं ठरवण्यात आलं होतं.  यामध्ये अजय देवगण (Ajay Devgn) दिग्गज फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'मैदान' सिनेमासंबंधित एका सूत्राने खुलासा केला की, "हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही साधारण स्पोर्ट्स फिल्म नाही. जगभरातील फुटबॉल प्लेअर  जापान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, थायलंड मधील प्लेयर्सना मैदान मध्ये येण्यासाठी आणि मॅच खेळण्यासाठी आमंत्रित केले. मैदान साठी मॅचेसची एक सीरिजच शूट करण्यात आली आहे. यात भारताला अनेक देशांविरोधात फुटबॉल खेळताना दाखवले गेले. इंटरनॅशनल लेव्हलवर याचे शूट झाले आहे. कुठेच क्वॉलिटीसोबत काटकसर केलेली नाही."

ते पुढे म्हणाले, "या सगळ्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे.  देशाला अभिमान वाटेल अशी फिल्म ते बनवत आहेत. ही एक लँडमार्क फिल्म म्हणून पुढे येईल." अजय देवगणचा कोणताही सिनेमा हा खासच असतो. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 'दृश्यम २' आणि 'भोला' नंतर अजयच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Ajay's Devgan next movie Maidan release postponed 7th time what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.