लेकीसाठी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर! सहलीहून परतलेल्या आराध्याची धावत जाऊन घेतली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:50 IST2026-04-22T08:49:44+5:302026-04-22T08:50:37+5:30

आई ती आईच शेवटी, मग ती विश्वसुंदरी का असेना! सहलीहून परतलेल्या लेकीसाठी ऐश्वर्याने केलं असं काही की...

Aishwarya Rai Bachchan Clicked Photos Of Aaradhya At Mumbai Airport Viral Video | लेकीसाठी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर! सहलीहून परतलेल्या आराध्याची धावत जाऊन घेतली गळाभेट

लेकीसाठी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर! सहलीहून परतलेल्या आराध्याची धावत जाऊन घेतली गळाभेट

Aishwarya Rai Aradhya Bachchan : बॉलिवूडची 'जागतिक सुंदरी' ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लाडकी लेक आराध्या यांच्यातील बॉण्डिंग नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. जागतिक स्तरावरील रेड कार्पेट असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम, आराध्या कायम आपल्या आईच्या सोबत असते. नुकताच या माय-लेकीचा एक अतिशय गोड व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. आराध्या तिच्या शाळेच्या सहलीसाठी बाहेर गेली होती. ती सहलीवरुन परतल्यानंतर तिला घेण्यासाठी ऐश्वर्याने स्वत: विमानतळावर आली होती. आराध्या दिसताच ऐश्वर्याने पुढे जाऊन तिला घट्ट मिठी मारली. एवढी मोठी स्टार असूनही आराध्यासाठी ऐश्वर्या तिथे एका सामान्य आईच्या भूमिकेत दिसली. ती केवळ आराध्याची वाट पाहत नव्हती, तर आपल्या फोनमधून आराध्याचे आणि तिच्या मित्र-मैत्रिणींचे फोटोही काढताना दिसली. व्हिडrओच्या शेवटी या दोघीही एकमेकींचा हात हातात घेऊन विमानतळाबाहेर पडताना दिसल्या.


सुखी संसाराची १९ वर्षे
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला काल १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल २००७ मध्ये हे दांपत्य विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने अभिषेक आणि आराध्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले होते. 

Web Title : ऐश्वर्या आराध्या के लिए फोटोग्राफर बनीं, स्कूल ट्रिप के बाद गले लगाया।

Web Summary : ऐश्वर्या राय बच्चन ने स्कूल ट्रिप के बाद एयरपोर्ट पर बेटी आराध्या का स्वागत किया। ऐश्वर्या ने एक सामान्य माँ की तरह व्यवहार किया, आराध्या और उसके दोस्तों की तस्वीरें खींची, जो उनके मजबूत बंधन को दर्शाती हैं। हाल ही में, ऐश्वर्या और अभिषेक ने अपनी 19वीं शादी की सालगिरह मनाई।

Web Title : Aishwarya becomes photographer for Aradhya, embraces her after school trip.

Web Summary : Aishwarya Rai Bachchan greeted daughter Aradhya at the airport after her school trip. Aishwarya acted like any mother, photographing Aradhya and her friends, showcasing their strong bond. Recently, Aishwarya and Abhishek celebrated their 19th wedding anniversary.