'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:05 IST2026-03-26T12:04:24+5:302026-03-26T12:05:45+5:30

'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांनंतर विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत

After 'Dhurandhar 2' there is talk of Operation Sindoor directed by vivek agnihotri | 'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

निर्माते भूषण कुमार (टी-सीरीज) आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री एका मोठ्या प्रकल्पासाठी एकत्र येत आहेत. 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांनंतर विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली जाणार आहे.

काय आहे 'ऑपरेशन सिंदूर'?

मीडिया रिपोर्टनुसार 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर केलेल्या थरारक मोहिमेवर आधारीत आहे. विवेक अग्निहोत्री नेहमीच अशा विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. आता विवेक यांना भूषण कुमार यांची साथ मिळाल्याने हा चित्रपट भव्यदिव्य असेल यात शंका नाही. लोकांना हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता आहे.

भूषण कुमार आणि विवेक अग्निहोत्री पहिल्यांदाच या निमित्ताने एका मोठ्या सिनेमासाठी एकत्र काम करणार आहेत. भूषण कुमार यांनी या प्रकल्पाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना सांगितले की, "विवेक अग्निहोत्री यांच्याकडे कथा सांगण्याची एक वेगळी आणि प्रभावी शैली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हा भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल."

'ऑपरेशन सिंदूर' या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून, यात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर' या नावामुळे आणि या दोन मोठ्या नावांच्या एकत्र येण्यामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : विवेक अग्निहोत्री की 'ऑपरेशन सिंदूर' में भारत का गुप्त मिशन।

Web Summary : 'द कश्मीर फाइल्स' के बाद, विवेक अग्निहोत्री टी-सीरीज़ द्वारा निर्मित 'ऑपरेशन सिंदूर' का निर्देशन करेंगे। फिल्म पहलगाम हमले के बाद भारत के गुप्त अभियान को दर्शाती है। शूटिंग जल्द शुरू होगी, जिसका लक्ष्य 2026 के अंत तक रिलीज करना है।

Web Title : Vivek Agnihotri's 'Operation Sindoor' to depict India's covert mission.

Web Summary : Following 'The Kashmir Files', Vivek Agnihotri directs 'Operation Sindoor', produced by T-Series. The film portrays India's covert operation after the Pahalgam attack. Shooting will commence soon, aiming for a late 2026 release, sparking considerable anticipation.