इंदर कुमारच्या निधनानंतर त्याच्या पूर्वप्रेयसीने दिली ही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:00 IST2017-07-28T12:30:42+5:302017-07-28T18:00:42+5:30

इंदर कुमारच्या मृत्युमुळे सगळ्यांनाच शॉक लागला आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. इशा कोप्पीकरने तर इंदरच्या मृत्यूमुळे तिला ...

After the demise of Inder Kumar, his reaction was given by his predecessor | इंदर कुमारच्या निधनानंतर त्याच्या पूर्वप्रेयसीने दिली ही प्रतिक्रिया

इंदर कुमारच्या निधनानंतर त्याच्या पूर्वप्रेयसीने दिली ही प्रतिक्रिया

दर कुमारच्या मृत्युमुळे सगळ्यांनाच शॉक लागला आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. इशा कोप्पीकरने तर इंदरच्या मृत्यूमुळे तिला चांगलाच धक्का लागला असल्याचे म्हटले आहे. इशा आणि इंदर हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. अनेक वर्षं त्यांचे अफेअर असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. इशा आणि इंदर हे एकेकाळचे कपल असले तरी आज ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. इंदरच्या मृत्युनंतर एका वर्तमानपत्रासोबत बोलताना इशा सांगते, मला आता नुकतेच इंदरविषयी कळले, हे ऐकून मला प्रचंड धक्काच बसला आहे. असे कोणासोबतच व्हायला नको असे मला वाटते. इंदर खूपच तरुण होता. तो केवळ 43 वर्षांचा होता. त्याला एक छोटीशी मुलगी देखील आहे. मला त्याच्या कुटुंबाविषयी खूपच दुःख वाटत आहे. त्याचा भाऊ गोल्डी आणि त्याचे तर खूपच जवळचे नाते होते. प्रत्येक संकटात गोल्डी त्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. इंदर हा अभिनेता म्हणून खूपच चांगला होता. पण त्याच्या काही वाईट सवयींमुळे तो मागे राहिला. त्याने आयुष्यात प्रत्येक गोष्ट जबाबदारीने केली असती तर आज असे घडलेच नसते. तो आजही आपल्यासोबत असता. आपण आयुष्य जगताना नेहमीच आपल्या आईवडिलांचा, पत्नीचा, भावा-बहिणीचा विचार केला पाहिजे असे मला वाटते. इंदरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. 
इशा आणि इंदर यांचे 2009पर्यंत अफेअर होते. पण त्याला दारूचे व्यसन असल्याने सतत त्यांच्यात खटके उडत असे. इशाने इंदरसोबत ब्रेकअप केल्यानंतर व्यवसायिक टिमी नारंगसोबत लग्न केले. 


Also Read : इंदर कुमारचे सलमान खानसोबत होते सख्ख्या भावासारखे नाते; हे पाच फोटो त्याचाच पुरावा!

Web Title: After the demise of Inder Kumar, his reaction was given by his predecessor