लग्नाच्या ४ वर्षांनी 'छावा'मधील 'हा' अभिनेता बनणार बाबा, शेअर केली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:33 IST2025-05-01T10:33:03+5:302025-05-01T10:33:55+5:30
छावामध्ये भूमिका साकारणारा हा लोकप्रिय अभिनेता बाबा होणार आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्याने ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलंय (chaava)

लग्नाच्या ४ वर्षांनी 'छावा'मधील 'हा' अभिनेता बनणार बाबा, शेअर केली गुडन्यूज
'छावा' सिनेमा (chhaava movie) चांगलाच गाजला. काहीच दिवसांपूर्वी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. ओटीटीवरही 'छावा' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच 'छावा' सिनेमातील एका अभिनेत्याने सर्वांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे 'छावा'मध्ये कवी कलश यांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता विनीत कुमार सिंग. विनीतने (vineet kumar singh) एका मुलाखतीत तो आणि त्याची पत्नी रुचिरा लवकरच आई-बाबा होणार असं जाहीर केलंय.
लग्नाच्या ४ वर्षांनी विनीतने दिली गुड न्यूज
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना विनीतने याविषयी खुलासा केला. विनीत म्हणाला की, "सध्या आम्हा दोघांसाठी ही वेळ खूप मौल्यवान आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही आई-बाबा होण्यासाठी खूप उत्सुक आहोत." अशा शब्दात विनीतने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विनीत आणि त्याची पत्नी रुचिरा या दोघांनी २०२१ ला एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या ४ वर्षांनी विनीत आणि रुचिरा आई-बाबा होणार असल्याने दोघेही खूश आहेत. चाहत्यांनी दोघांचं अभिनंदन केलंय
विनीतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्याचं करिअर सध्या सातवे आसमाँ पर आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विनीतने 'छावा'मध्ये साकारलेली कवी कलश यांची भूमिका प्रचंड गाजली. विनीतच्या अभिनयाचं खूुप कौतुक झालं. त्यानंतर विनीतने सनी देओलसोबत 'जाट' सिनेमात अभिनय केला. या सिनेमात विनीतने खलनायकी पद्धतीची भूमिका साकारली. विनीतने 'लालबाग परळ' या मराठी सिनेमात तसेच 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'मुक्काबाज' या सिनेमांमधून त्याच्या समर्थ अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.