"भारतीय कलाकारांसाठी तिने काही केलं नाही, ती फक्त..."; प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रियंका चोप्रावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:15 IST2025-10-31T13:12:29+5:302025-10-31T13:15:55+5:30
प्रियंका चोप्रा फक्त स्वतःचा फायदा बघते, असा आरोप करत प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"भारतीय कलाकारांसाठी तिने काही केलं नाही, ती फक्त..."; प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रियंका चोप्रावर गंभीर आरोप
टीव्ही शो 'बा बहू और बेबी' फेम अभिनेत्री श्वेता केसवानी हिने ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्यावर थेट टीका केली आहे. श्वेताने प्रियंकाची तुलना अमेरिकन अभिनेत्री मिंडी कलिंग (Mindy Kaling) सोबत करताना प्रियंका इतरांना मदत न करता फक्त स्वतःलाच मदत करते, असा आरोप केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री?
श्वेता केसवानीचे प्रियंकावर आरोप
प्रियंका चोप्राहॉलिवूडमध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असल्याबद्दल श्वेता केसवानीला नुकतंच एका मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर तिने प्रियंकावर टीका करताना अनेक गंभीर विधानं केली. श्वेता म्हणाली की, ''प्रियांका चोप्रापेक्षा अमेरिकन अभिनेत्री मिंडी कलिंग ही परदेशात भारतीय आणि दक्षिण आशियाई महिलांना अधिक मदत करते. मिंडी कलिंगने पडद्यामागील अनेक दक्षिण आशियाई लेखकांना आणि दिग्दर्शकांना संधी दिली आहे. प्रियांका चोप्रा फक्त स्वतःला मदत करते. ती फक्त स्वतःच्याच करिअरला पुढे नेत आहे, भारतीय कलाकारांना किंवा लेखकांना संधी देण्यासाठी ती काही करत नाही."
प्रियांकाला हॉलिवूडमध्ये संधी मिळाली, पण तिने इतर भारतीयांसाठी दरवाजे उघडले नाहीत, असंही नमूद केले. श्वेता केसवानीच्या या विधानांमुळे बॉलिवूडमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर प्रियंका चोप्रा काय प्रतिक्रिया देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रियंकाने गेल्या काही वर्षात हॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. प्रियंका हॉलिवूडमधील अनेक बिग बजेट प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळते.
