हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:35 IST2025-10-28T14:31:24+5:302025-10-28T14:35:35+5:30
कालच अभिनेत्रीने ४९ वा वाढदिवस साजरा केला.

हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज लाईमलाईटपासून दूर गेले आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना काही अभिनेत्रींनी लग्न केलं आणि ते परदेशी स्थायिक झाले. माधुरी दीक्षित हे सर्वात मोठं उदाहरण आहे. आता माधुरी कुटुंबासोबत भारतात परतली आहे. दरम्यान एक अशी अभिनेत्री जिने सलमान, अनिल कपूर, अक्षय कुमार अशा अनेकांसोबत काम केलं आणि नंतर ती लग्न करुन अमेरिकेत गेली. मात्र ८ वर्षातच तिचा घटस्फोट झाला. कोण आहे ती?
अनिल कपूरच्या 'नायक' या गाजलेल्या सिनेमात रिपोर्टरच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री आठवतेय? ती आहे अभिनेत्री पूजा बत्रा. पूजाने कालच ४९ वा वाढदिवस साजरा केला. पूजाने सलमान खानच्या 'कही प्यार ना हो जाए' मध्येही काम केलं होतं. पूजा बत्राने १९९३ साली फेमिना मिस इंडिया मधून करिअरला सुरुवात केली होती. तिने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला होता. नंतर तिने मॉडेलिंग केलं. काही जाहिरातींमधून ती नावारुपाला आली. १९९७ साली ती अनिल कपूर आणि तबूच्या 'विरासत' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमातून तिने लक्ष वेधून घेतलं होतं. नंतर तिने 'भाई','हसीना मान जाएगी','दिल ने फिर याद किया' असे अनेक सिनेमे केले.
पूजाने २००३ साली सोनू आहलूवालिया या बिझनेसमनसोबत लग्न केलं. लग्न करताच ती अमेरिकेत शिफ्ट झाली. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये बिनसलं. २०११ साली त्यांचा घटस्फोट झाला. सोनू यांना मूल हवं होतं आणि पूजाला नको होतं हे त्यांच्या घटस्फोटाचं कारण ठरलं. घटस्फोटानंतर पूजा पुन्हा भारतात आली. तिने कमबॅकचाही प्रयत्न केला. 'हम तुम शबाना','एबीसीडी २','किलर पंजाबी' या सिनेमांमध्येही ती दिसली. २०१९ मध्ये पूजाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं. तिने डॉन फेम अभिनेता नवाब शाहसोबत दुसरं लग्न केलं. तिचा दुसरा संसार सुखात सुरु आहे.