"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…", घटस्फोटानंतर हंसिका मोटवानी पहिल्यांदाच झाली व्यक्त, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:43 IST2026-04-17T09:38:19+5:302026-04-17T09:43:43+5:30

अर्ध्यावरती डाव मोडला! लग्नाच्या ४ वर्षानंतर  प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, म्हणाली-"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…"

actress hansika motwani express her feelings frist time after divorce with sohael khaturiya know about what she said | "चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…", घटस्फोटानंतर हंसिका मोटवानी पहिल्यांदाच झाली व्यक्त, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न, म्हणाली...

"चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा…", घटस्फोटानंतर हंसिका मोटवानी पहिल्यांदाच झाली व्यक्त, मैत्रीणीच्या एक्स पतीशी केलेलं लग्न, म्हणाली...

Hansika Motwani: बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हंसिका मोटवान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या चार वर्षानंतर उद्योजक सोहेल खतुरियासोबत घटस्फोट घेतला. त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या.अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या. परस्पर संमतीने हंसिका आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजुर केला. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हंसिकाने केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

हंसिकाने हॉटरफ्लायशी बोलताना लग्न आणि प्रेम या गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसेच तिला घटस्फोटानंतर कठीण काळात कुटुंबियांची कशी साथ मिळाली, याविषयी देखील तिने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली,"माझे कुटुंब माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकत नाही. लोकांना क्लिक बेट हवं होतं ते त्यांना मिळालं.त्यांना हेडलाईन्स पाहिजे होत्या, आणि तेही त्यांना मिळाले. मी यावर कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि देणारही नाही, कारण मला अशा गोष्टींमुळे कधीच फरक पडत नाही. चुकीच्या गोष्टी, त्रास सहन करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडलेलं बरं. मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मला याचा जराही पश्चाताप नाहीये. जे आहे ते छान आहे आणि मी त्यात खुश आहे."

दरम्यान, हंसिका लग्न आणि मातृत्वाबद्दल देखील आपलं मत मांडलं. ती म्हणाली,"लोक म्हणतात ठराविक वयात लग्न करायला पाहिजे. आजकाल तुम्ही काय करावं याबद्दल सल्ला देणारे अनेक लोक आहेत. पण आजच्या मुली इतक्या सक्षम आणि स्वतंत्र आहेत की, त्या स्वतःसाठी जे योग्य आहे तेच त्या करतात.पूर्वी लोक म्हणायचे की २५ व्या वर्षी लग्न करा, मग ३० व्या वर्षी, आता ४० व्या वर्षी म्हणतात. हे लोक कोण आहेत? लग्नानंतरही ते मूल जन्माला घाला असं म्हणतात. पण तुम्हाला जर ते योग्य वाटत नसेल, तसं करु नका."
 
४ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये केलेलं लग्न

हंसिका व सोहेलने ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूरमधील मुंडोटा किल्ल्यावर थाटामाटात लग्न केलं होतं. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाचे सगळे सोहळे एका रिअॅलिटी डॉक्युमेंटरी सीरिजमध्ये शूट करून ते ओटीटीवर प्रसारित करण्यात आले होते. सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरखाली हंसिकाला प्रपोज केलं होतं आणि नंतर त्यांनी लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न ३ वर्षेही टिकलं नाही.

Web Title : तलाक के बाद हंसिका मोटवानी का खुलासा, एक्स-हसबैंड की शादी पर बोलीं.

Web Summary : हंसिका मोटवानी ने चार साल बाद सोहेल कथूरिया से तलाक की पुष्टि की. उन्होंने नकारात्मकता सहने के बजाय व्यक्तिगत भलाई को प्राथमिकता देने पर जोर दिया, कोई पछतावा नहीं जताया और अपनी शादी और जीवन विकल्पों के बारे में सार्वजनिक जांच के बीच पारिवारिक समर्थन को महत्व दिया.

Web Title : Hansika Motwani speaks up post-divorce, addresses ex-husband marriage.

Web Summary : Hansika Motwani confirms her divorce from Sohel Kathuria after four years. She emphasizes prioritizing personal well-being over enduring negativity, expressing no regrets and valuing family support amidst public scrutiny regarding her marriage and life choices.