लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:04 IST2019-05-11T13:03:52+5:302019-05-11T13:04:43+5:30

आय हेट लव स्टोरी फेम या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे

Actress Bruna Abdullah is five months pregnant | लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज

लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज

ठळक मुद्देब्रुना अब्दुल्लाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे. ब्रुनाचा पाचवा महिना सुरू असून तिच्या या गुड न्यूजमुळे ती प्रचंड खूश आहे. लग्न न करता आपण मुलाला जन्म देणार आहोत याची तिला अजिबातच पर्वा नाहीये.

लग्नाच्या आधी अभिनेत्रींनी आई होणे हे आता बॉलिवू़डमध्ये नवीन नाही. सारीका, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्री लग्नाच्या आधी गरोदर होत्या आणि त्यांनी ही गोष्ट मीडियात देखील कबूल केली आहे. अॅमी जॅक्सनने देखील काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याचे सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले होते आणि आता तिने आपल्या प्रियकरासोबत नुकताच साखरपुडा केला. तिच्यानंतर आय हेट लव स्टोरी फेम ब्रुना अब्दुल्लाने ती गरोदर असल्याचे सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे.

ब्रुना अब्दुल्लाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे. ब्रुनाचा पाचवा महिना सुरू असून तिच्या या गुड न्यूजमुळे ती प्रचंड खूश आहे. लग्न न करता आपण मुलाला जन्म देणार आहोत याची तिला अजिबातच पर्वा नाहीये. लग्नाच्या आधी आई बनण्यावर ब्रुनाचे म्हणणे आहे की, एका कागदाच्या तुकड्यावर सही करून लग्नाद्वारे दोन व्यक्ती एकत्र येतात. पण लग्नानंतर देखील अनेक लोक घटस्फोट घेत असल्याचे पाहायला मिळते. मात्र लग्न न करता देखील अनेक जोडपी खुश असतात. कोणतेही नाते टिकवण्यासाठी केवळ प्रेमाची गरज असते. पण त्याचसोबत लग्न हे प्रेमाचे प्रतीक असल्याचे देखील ती मान्य करते. 

ब्रुना अब्दुल्लाने तिच्या तब्येतीविषयी देखील माहिती दिली आहे. ती सांगते, बाळ हेल्दी असून त्याची वाढ चांगल्याप्रकारे होत आहे. मी माझ्या प्रेग्नन्सीची बातमी घरी सांगितल्यावर माझ्या घरातले प्रचंड खूश झाले होते. माझी आई तर या क्षणाची कित्येक वर्षांपासून वाट पाहात होती. माझ्या परिवारासाठी हे खूप छान गिफ्ट आहे. माझे बाळ आता 22 आठवड्यांचे झाले असून त्याच्या जन्माची मी आणि या बाळाचे वडील एलिन आतुरतेने वाट पाहात आहोत. माझ्या बाळाचा जन्म सप्टेंबरमध्ये होणार आहे.

ब्रुना अब्दुल्ला आणि एलिन लवकरच लग्न करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Actress Bruna Abdullah is five months pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.