अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, पत्नीने भावुक पोस्ट केली शेअर, म्हणाली- "तू नसलास तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:36 IST2025-10-23T10:30:43+5:302025-10-23T10:36:15+5:30
Rishabh Tondon Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाल्याने पत्नीला मोठा धक्का बसला आहे. पत्नीने तिच्या मनातील भावना शेअर करुन भावुक पोस्ट शेअर केली आहे

अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, पत्नीने भावुक पोस्ट केली शेअर, म्हणाली- "तू नसलास तरी..."
Rishabh Tondon Death:बॉलिवूडमध्ये आपल्या गायनाने आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारा तरुण कलाकार ऋषभ टंडन याचं अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने ऋषभचा मृत्यू झाला. दिवाळीच्या निमित्ताने ऋषभ टंडन दिल्लीत त्याच्या कुटुंबासोबत होता, त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पतीच्या अकाली निधनाने ऋषभ टंडनची रशियन वंशाची पत्नी ओलेसिया नेदोबेगोवा यांना मोठा धक्का बसला आहे.
ओलेसियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत पती ऋषभला श्रद्धांजली वाहिली आहे. ओलेसियाने ऋषभसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. माझा प्रिय पती, मित्र आणि पार्टनर, तू मला सोडून गेलास. मी तुला वचन देते की, मी तुझी सर्व स्वप्नं पूर्ण करेन. तुझं निधन झालेलं नाही, तर तू माझ्यासोबत आहेस. माझा आत्मा, माझं हृदय, माझं प्रेम, माझा राजा.", अशा शब्दात ओलेसियाने पोस्ट केली आहे.
ऋषभ टंडनने रशियन नागरिक असलेल्या ओलेसिया नेदोबेगोवाशी विवाह केला होता. एका मुलाखतीत ऋषभने सांगितलं होतं की, लग्नानंतर त्याचं आयुष्य खूप रोमांचक बनलं आहे. रशियाची असल्याने ओलेसियासोबत भाषा आणि संस्कृतीच्या अनेक समस्या आल्या, पण त्यांच्या प्रेमाच्या भाषेने या सर्व अडचणींवर मात करता आली. ऋषभ टंडनने आपल्या अखेरच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ओलेलियासोबत करवा चौथ सणाचं सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर केले होते. ज्यात हे जोडपे एकमेकांसोबत पारंपरिक विधी करताना दिसले होते. ऋषभ यांच्या निधनाने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे.