'कालाकांडी'मधील सैफ अली खानच्या अभिनयाची आमिर खानने केली स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 06:30 AM2018-01-12T06:30:30+5:302018-01-12T12:00:30+5:30

बॉक्स ऑफिसवर सैफ अली खानचा कालाकांडी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर बघून तर सैफ एक ...

Aamir Khan praised Saif Ali Khan for his performance in 'Kalaakandi' | 'कालाकांडी'मधील सैफ अली खानच्या अभिनयाची आमिर खानने केली स्तुती

'कालाकांडी'मधील सैफ अली खानच्या अभिनयाची आमिर खानने केली स्तुती

googlenewsNext
क्स ऑफिसवर सैफ अली खानचा कालाकांडी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर बघून तर सैफ एक वेगळ्याच अंदाजात दिसला होता. चित्रपट रिलीज होण्याआधी प्रीमियरच्या दरम्यान आमिर खानने हा चित्रपट बघितला आहे. त्याला या चित्रपटातील सैफचा अभिनय खूप आवडला आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात आमिर खानने चित्रपट कालाकांडीमधील सैफच्या अभियाची प्रशंसा केली आहे. सैफने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्याचे आमिर म्हणाला. गुरुवारी प्रिमियरमध्ये चित्रपट बघितल्यानंतर त्यांने ट्वीट केले. 

त्यांने लिहिले की, कालाकांडी एक धमाल चित्रपटांपैकी एक आहे, खूप वेळानंतर मी असा चित्रपट बघितला. डेली बेली चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर मी पहिल्यांदा एवढा हसलो. मला चित्रपटातील सगळ्या कालकारांचा अभिनय आवडला. सैफचा अभिनय उत्कृष्ट आहे. या चित्रपटातून दिग्दर्शनात डेब्यू केलेल्या अक्षतवर मला गर्व आहे.''   

आमिर खान आणि सैफ अली खान यांनी 'दिल चाहता है' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट तेव्हा सुपरहिट गेला होता.  अलीकडच्या काळात सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही. काही महिन्यांपूर्वी आलेला ‘शेफ’ हा त्याचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. त्यामुळे कालाकांडी या चित्रपटाकडून सैफला बऱ्याच अपेक्षा आहेत. ‘कालाकांडी’ हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सेन्सॉर ‘कालाकांडी’मध्ये  बोल्ड सीन्स आणि शिव्यांची भरमार आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते. या चित्रपटात सैफला पोटाचा कॅन्सर असतो. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. याआधी हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार होता.  या चित्रपटात सैफशिवाय कुणाल राय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, अक्षय ओबेरॉय, इशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील आदी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यानंतर एप्रिलमध्ये सैफचा आणखीन एक चित्रपट रिलीज होणार आहे. बाजार हा चित्रपट सैफ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. 

ALSO READ :  तैमूरला वयाच्या या वर्षी पाठवणार बोर्डिंग स्कूलमध्ये

Web Title: Aamir Khan praised Saif Ali Khan for his performance in 'Kalaakandi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.