आजीला मिठी मारताच इमोशनल झाली आराध्या, करू लागली ‘हा’ हट्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 21:15 IST2018-05-23T15:45:22+5:302018-05-23T21:15:22+5:30

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन नुकतीच मुलगी आराध्यासोबत ७१ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या ठिकाणी ...

Aaliyas became emotional in the hilari, aadhaa did, and ha ha! | आजीला मिठी मारताच इमोशनल झाली आराध्या, करू लागली ‘हा’ हट्ट!

आजीला मिठी मारताच इमोशनल झाली आराध्या, करू लागली ‘हा’ हट्ट!

जी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन नुकतीच मुलगी आराध्यासोबत ७१ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या ठिकाणी माय-लेकीची बॉण्डिंग बघण्यासारखी होती. मंगळवारी ऐशला पुन्हा एकदा आराध्यासोबत बघण्यात आले. त्याचे झाले असे की, यावेळेस आराध्या आपल्या मम्मीसोबत आजी वृंदा राय यांच्या बर्थ डेनिमित्त डिनरला गेली होती. रेस्टॉरेंटच्या बाहेर निघताना या तिघींना एकत्र बघण्यात आले. यावेळी आराध्या आजीला मिठी मारून चांगलीच इमोशनल झाल्याचीही दिसून आले. 











रेस्टॉरेंटच्या बाहेर आपल्या आईसोबत ऐश्वर्या बघावयास मिळाली. यावेळी आराध्याचेही काही फोटोज् समोर आले. त्यामध्ये आराध्या चांगलीच इमोशनल झाल्याचे दिसून आले. आराध्याला आजीसोबत आणखी वेळ घालवायचा होता. ती आजीसोबत राहण्यासाठी हट्ट करीत होती. यावेळी ती चांगलीच इमोशनल झाल्याचेही दिसून आले. जेव्हा आजी वृंदा आपल्या कारमध्ये बसत होत्या. तेव्हा आराध्या त्यांना सोडत नव्हती. मात्र नंतर मम्मी ऐश्वर्याने तिला समजावून सांगितल्यानंतर आराध्याच्या चेहºयावर काहीसे हसू फुलले. 

Web Title: Aaliyas became emotional in the hilari, aadhaa did, and ha ha!