सौंदर्यवती जॅकलीनला बनायचंय बॉलिवूडची 'अॅक्शन आयकॉन'

By Admin | Published: February 16, 2017 01:08 PM2017-02-16T13:08:18+5:302017-02-16T13:08:18+5:30

मर्डर २, किक, रॉय यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून चमकलेल्या जॅकलीन फर्नांडिसला बॉलिवूडमध्ये अॅक्शन आयकॉन म्हणून नाव कमवायचं आहे.

Bollywood actress Jacqueline wants to make 'action icon' | सौंदर्यवती जॅकलीनला बनायचंय बॉलिवूडची 'अॅक्शन आयकॉन'

सौंदर्यवती जॅकलीनला बनायचंय बॉलिवूडची 'अॅक्शन आयकॉन'

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - श्रीलंकन सौंदर्यवती जॅकलिन फर्नांडिसला  'अलाद्दिन' या पदार्पणातील चित्रपटातच रितेस देशमुख आणि अमिताभ बच्चन सारख्या दिग्गजांसबोत काम करण्याची संधी मिळाली. केवळ एक सौंदर्यवती म्हणून न मिरवता तिने मर्डर २, किक, रॉय सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातही भूमिका निभावत चित्रपटसृष्टीत एक ठसा उमटवला आहे. आता याच जॅकलिनला बॉलिवूडमधील ' अॅक्शन आयकॉन' म्हणून ओळख मिळवायची आहे. 
नुकत्याच आलेल्या ' फ्लाईंग जट ' या चित्रपटात तिने टायगर श्रॉफसोबत स्क्रीन तर शेअर केलीच पण अॅक्शन सीक्वेन्सही केले. त्यामुळे आगामी 'रिलोड' आणि ' ड्राइव्ह' या चित्रपटातही ती काही अॅक्शन दृश्य करताना दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना तिने ' अॅक्शन आयकॉन' मिळवायची इच्छा असल्याचे म्हटले आहे.  ' ही (अॅक्शन) शैली खूप सानदार असून मला ती दृश्य सहजतेने पार पाडताही येतात. त्यामुळे आगामी काळात मी अॅक्शन आयकॉन बनू शकले तर मला खूप आनंद होईल' असंही ती म्हणाली. ' तस पहायला गेलं तर अॅक्शन चित्रपटात अभिनेत्रींना फारसा काही वाव नसतो, त्यांची भूमिकाही कमी महत्वाची असते. मात्र अशा वेळेस आपण हॉलिवूडपासून शिकलं पाहिजे' असंही जॅकलिनने नमूद केलं. 

Web Title: Bollywood actress Jacqueline wants to make 'action icon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.