अतुल दिसणार कर्नलच्या भूमिकेत!

By Admin | Updated: March 22, 2017 01:09 IST2017-03-22T01:09:31+5:302017-03-22T01:09:31+5:30

अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या कारकिर्दीत निरनिराळ्या भूमिका गाजवल्या आहेत. आता अतुल आपल्या चाहत्यांना एका नव्या भूमिकेत

Atul appeals to the role of Colonel! | अतुल दिसणार कर्नलच्या भूमिकेत!

अतुल दिसणार कर्नलच्या भूमिकेत!

अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या कारकिर्दीत निरनिराळ्या भूमिका गाजवल्या आहेत. आता अतुल आपल्या चाहत्यांना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळेल. एकता कपूरच्या नव्या वेबसिरीजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसिरीजमधील अतुलची भूमिका ही आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल. या वेबसिरीजचे नागेश कुकनूर दिग्दर्शन करणार असून, तीत अतुल कुलकर्णी ब्रिगेडियर साठ्ये ही भूमिका साकारणार आहे. अतुलची भूमिका ही स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्याची असल्याचे म्हटले जाते. सैनिकांना खास प्रशिक्षण देणाऱ्या सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. याबद्दल अतुल कुलकर्णी सांगतो, ‘एक अभिनेता म्हणून मी माझ्या करिअरमध्ये नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. तसेच, माझ्या चित्रपटांच्या कथादेखील खूप वेगळ्या निवडल्या आहेत. मला या वेबसिरीजमधील नागेश या भूमिकेबाबत जेव्हा विचारण्यात आले त्या वेळी ही भूमिका ऐकूनच मी खूप खूष झालो. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक होतो. सैनिकांबद्दल असलेल्या चित्रपट, मालिका प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडतात. या वेगळ्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजद्वारे काही नवी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नागेशसोबत या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे.’ एकता कपूर निर्माती असलेल्या या वेबसिरीजचे नाव अद्याप तरी ठरलेले नाही.

Web Title: Atul appeals to the role of Colonel!