अशोक पत्कींचा मुलगा झळकणार चित्रपटात

By Admin | Updated: March 12, 2017 01:46 IST2017-03-12T01:46:34+5:302017-03-12T01:46:34+5:30

संगीतकार अशोक पत्की यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली सगळीच गाणी अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी आभाळमाया, हॅलो इन्स्पेक्टर

Ashok Patki's son Jhalakaye in the film | अशोक पत्कींचा मुलगा झळकणार चित्रपटात

अशोक पत्कींचा मुलगा झळकणार चित्रपटात

संगीतकार अशोक पत्की यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली सगळीच गाणी अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी आभाळमाया, हॅलो इन्स्पेक्टर यांसारख्या मालिकांना दिलेले संगीतही खूप गाजले होते. आता त्यांचा मुलगा आशुतोष चित्रपटसृष्टीत येण्यास सज्ज झाला आहे. पण आशुतोष वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीतसृष्टीत आपले करिअर करणार नाहीये तर तो एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘वन्स मोअर’ या चित्रपटात तो झळकणार आहे. 'वन्स मोअर' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटात आशुतोषसोबत अभिनेत्री धनश्री पाटील झळकणार आहे. धनश्रीचादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. याचसोबत रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा तळवळकर, नरेश बिडकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा श्वेता बिडकर यांची असून नरेश बिडकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत झाला असून, काही चित्रीकरण गोव्यात होणार आहे. विशेष म्हणजे शेफ विष्णू मनोहरदेखील एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. आशुतोषने याआधी मेंहदीच्या पानावर, दुर्वा यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Ashok Patki's son Jhalakaye in the film