अभिनेत्री साधना पंचत्वात विलीन

By Admin | Updated: December 27, 2015 00:45 IST2015-12-27T00:45:53+5:302015-12-27T00:45:53+5:30

अभिनेत्री साधना शिवदासानी यांच्या पार्थिवावर शनिवारी येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत आणि निर्माते या वेळी उपस्थित

Actress Sadhana merged with Panchayat | अभिनेत्री साधना पंचत्वात विलीन

अभिनेत्री साधना पंचत्वात विलीन

मुंबई : अभिनेत्री साधना शिवदासानी यांच्या पार्थिवावर शनिवारी येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत आणि निर्माते या वेळी उपस्थित होते. साधना यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्या कर्करोगाने पीडित होत्या.
गुरुवारी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. साधना यांच्या मोठ्या भावाने त्यांना भडाग्नी दिला. अंत्यसंस्कारप्रसंगी दीप्ती नवल, सलीम खान, हेलन, आशा पारेख, वहिदा रेहमान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, अनू कपूर आणि करण जोहर यांची आई हीरू जोहर आदी उपस्थित होते. प्रसिद्ध निर्माते आर. के. नय्यर यांच्याशी साधनांचा विवाह झाला होता. त्यांना अपत्य नाही.

Web Title: Actress Sadhana merged with Panchayat