"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
By कोमल खांबे | Updated: May 13, 2026 13:52 IST2026-05-13T13:51:23+5:302026-05-13T13:52:02+5:30
'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. या सिनेमानंतर अभिनेत्याला शंभूराजे म्हणून चाहते हाक मारू लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने हा खास किस्सा सांगितला.

"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Raja Shivaji: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनने छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे (संभाजी शहाजीराजे भोसले) ही भूमिका साकारली आहे. 'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. या सिनेमानंतर अभिनेत्याला शंभूराजे म्हणून चाहते हाक मारू लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने हा खास किस्सा सांगितला.
अभिषेक बच्चनने इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने 'राजा शिवाजी'नंतर घडलेला एक किस्सा सांगितला. अभिषेक म्हणाला, "काही दिवसांपूर्वी हा किस्सा घडला. मी ट्राफिक सिग्नलवर थांबलो होतो. कोणीतरी मला शंभूराजे म्हणून हाक मारली. माझ्यासोबत असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं. याआधी असं कधीच घडलं नव्हतं. यावरुनच आपल्याला कळतं की मी साकारलेली भूमिका लोकांना किती आवडली आहे. यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी खूप वाढली आहे. अशा भूमिकांना पूर्णपणे न्याय दिला गेला पाहिजे".
'राजा शिवाजी' सिनेमातून पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू शंभूराजे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत भाग्यश्री, सलमान खान, फरदीन खान, संजय दत्त, विद्या बालन, बोमन इराणी हे कलाकारही झळकले आहेत. आत्तापर्यंत 'राजा शिवाजी' सिनेमाने जगभरात ८६ कोटींचा गल्ला जमवला आहे.