शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा जोडीदार ‘डिप्रेस्ट’ आहे? मग तुम्ही त्याच्याशी कसं वागाल?

By admin | Updated: July 14, 2017 16:58 IST

प्रेम, माया आणि काळजी घेणं या तीन गोष्टी जगायला नवी उमेद देऊ शकतात..

-निशांत महाजनडिप्रेशन हा शब्द आपण सहज वापरतो. इतका सहज की हल्ली लहान मुलांनाही पटकन बोअर होतं, ते डिप्रेस्ट होतात, हर्ट होतात. आणि मग त्यावर काहीतरी थातूरमातूर चॉकलेट देऊन पालकही तो प्रश्न सोडवतात किंवा सुटला असं मानतात. पण डिप्रेशन ही रोजच्या जगण्यातली गोष्ट हाताळणं इतकं सोपं नाही. आणि त्यातही आपल्या जोडीदाराला डिप्रेशन आलं असेल तर ते समजून घेणं, त्याला काऊन्सिलरकडे नेणं, आणि मुख्य म्हणजे आपलं त्याच्याशी वागणं बदलणं, त्याच्याशी संवादाची रीत बदलणं फार महत्वाचं असतं. अनेकदा घरातल्या माणसांची चूक होते ती इथंच. डिप्रेशन आलेल्या माणसांना समजून घेण्यात अनेकदा जोडीदारच कमी पडतात.१) मूड जातात अनेकदा डिप्रेशन आलं की, उदास होतात. काहीतरी विचित्र वागतात असं वाटू शकतं. तेव्हा न चिडता, त्याक्षणी नेमके मानसिक चढउतार काय आहेत, हे समजून घेऊन, मन आजारी आहे हे जाणून संबंधित व्यक्तीशी बोलायला हवं. आजारी काही कुणी स्वत:हून पडत नाही, आजारी असणं काही चूक नव्हे त्यामुळे दोष देणं, टीका करणं थांबवावं.२) डॉक्टरकडे जावं. आपला जोडीदार उपचारासाठी येत नसेल तर आपण जावं, त्याला उपचारासाठी राजी कसं करायचं हे समजून घ्यावं, त्यादिशेनं प्रयत्न करावेत. डॉक्टरकडे नाही ना जायचं, मग जा उडत अशी बेफिकीर वृत्ती असू नये.३) प्रेम थोडं जास्त करावं. खरंतर ही आपल्या प्रेमाचीच परीक्षा असते. मायेनं मनं जिंकता येतातच. मग आपल्याच माणसावर थोडं जास्त प्रेम करण्यात काही चूक नाही.

 

४) टोचून बोलू नये. आपल्या नकळतही तो आपला एक स्वभाव असतो. आपण इतरांना तिरकं, टोचून, टोमणे दिल्यागत बोलतो. तसं आपल्याला बोलायचं नसतं, पण आपणही रागाच्या भरात ते बोलतोच. म्हणून तसं करणं टाळावं.५) भांडू नये. भांडणाचे प्रसंग येतातच. पण संयम धरावा. आणि शब्दानं शब्द वाढवण्यापेक्षा शांततेनं संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.६) आर्थिक कटकटी होतात. पैसे कमी पडतात. त्यानं चिडचिड होते. त्यावर काही मार्ग निघतो का पहावं. त्रागा करुन, भांडून आर्थिक प्रश्न कुणाचेही सुटत नाही.७) डिप्रेशन हा आजार बरा होतो, वेळीच त्यावर उपचार सुरु करण्याचे प्रयत्न मात्र करायला हवेत.