शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलं म्हणतात, अ‍ॅक्सिडण्ट झाला तरच गाडी चालवताना फोनवर बोलणं थांबवू!

By admin | Updated: July 14, 2017 15:59 IST

गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे सगळ्यांनाच कळतं, मग तरी लोक का बोलतात फोनवर?

- चिन्मय लेलेगाडी चालवताना, मान वाकडी करुन, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यानांच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरुन बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण नाही जगभरातच लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जावू शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि हे फक्त आपल्याचकडे होत असं नाही, जगभरातल्या तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट झाला तरच!

अलिकडेच लंडनमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्याचं नाव होतं बी स्मार्टफोन कॅम्पेन. म्हणजे काय तर स्मार्ट फोन वापरताना जरा स्मार्ट व्हा. लंडनमध्ये राहणाऱ्या विविध देशातल्या, विविध धर्मा-वंशाच्या आणि स्थानिक ब्रिटिश तरुणांनाही हाच एक प्रश्न विचारण्यात आला की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे तुम्हाला मान्य आहे का? आणि असेल तर तुम्ही का बोलता फोनवर?त्यावर १० टक्के मुलांनी सांगितलं की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये असं आम्हाला वाटतं, पण अनेकदा सवयीनं बोलतो. ही सवय मोडायला हवी हे आम्हाला मान्यच आहे.उरलेल्या ३० टक्केंचं म्हणणं की, त्यात काय एवढं, आमचा गाडीवर उत्तम कण्ट्रोल असतो. काही बिघडत नाही बोललं तर? लगेच काय अपघात होत नाही.उरलेले ६० टक्के तर म्हणतात की, बोलू नये हे कळतंच आम्हाला. पण जोवर आमचा गाडी चालवत फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट होत नाही, तोवर मात्र आम्ही असंच वागू. झालाच अपघात तर पुढचं पुढे!आता अशी बेर्पवाई असेल तर कुठं कुणाला सामान्य ज्ञान शिकवायचं आणि कुठं कायद्याचे धाक दाखवायचे नाही का? मनाचा ब्रेकच लागत नाही तिथं कोण काय करू शकतं?