शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

विज्ञानाच्या बळावरच जग महासत्ता होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:06 IST

​राष्ट्रीय विज्ञान दिवस विशेष

- राष्ट्रीय विज्ञान दिवस विशेषभारताला विज्ञानाचा पारंपरिक वारसा लाभला आहे. गणितातील शुन्याच्या शोधापासून ते वैद्यकशास्त्रात शस्त्रक्रिया करण्याचे शास्त्र भारताने जगाला दिले. व्यापाराचा मार्ग अवरूद्ध झाल्याने युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. यामुळे विज्ञानाचे खरे पाईक असल्याचा अविर्भाव पाश्चिमात्य देशात रुढ झाला. भारतात पाश्मिात्य शिक्षण पद्धतीचा प्रसार झाल्याने विज्ञानाला नवी परीभाषा मिळाली.भारतातील महान वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधनिबंधास 28 फेब्रुवारी रोजी नोबेल मिळाल्याच्या निमित्ताने हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळण्याची प्रथा 1987 पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व मानवी जीवनाला अधिकाधिक सुकर बनविण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाज प्रवृत्त व्हावा, हाच यामागील उद्देश आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयआयटी शिक्षणासाठी सरकारी स्तरावरील प्रयत्न अपुरे पडल्याने खाजगी शिक्षण संस्थांनी यात प्रवेश केला मात्र यामुळे शिक्षण वाढावे असे प्रयत्न कमी झालेले दिसून येत आहेत. याचमुळे शासकीय शिक्षण संस्थांना आजही प्रचंड मागणी असल्याचे दिसते, खाजगी शिक्षण क्षेत्र विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्यात मागे पडल्याने असे झाले असावे असे मानले जाते.विज्ञान शिकणे म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिाकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा विषय असे अजिबात नाही. आपल्या मनात आलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. आपल्या मनातील अंधश्रध्दा काढून टाकून, विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. अंधश्रध्दा, रुढी, परंपरा यामध्ये अडकून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संकल्प या दिनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.ज्ञान आधुनिक मानवी जीवनाचा पाया आहे या नजरेने वैज्ञानिक संशोधनाकडे पाहिले जाण्याची गरज आहे. सीएनएक्सने विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानच्या विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून हाच सूर उमटला. विज्ञानवादी दृष्टिक ोन निर्माण व्हावा विज्ञानाने मनुष्य कुठल्याही गोष्टीच्या तळापर्यंत पोहचू शकतो. सत्य असत्य काय, ही बाब तार्किकदृष्या पडताळण्याची क्षमता विज्ञानात असते. विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणजे नेमके काय याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आजच्या सर्व शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर आली आहे. हे कार्य करण्याचा निर्धार विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. - प्रा. राहुल गुढे , संशोधकमानव जीवनासाठी विज्ञान आवश्यकविज्ञान शिकत असताना एक गोष्ट प्रकर्षाणे जाणवते ती म्हणजे मानवाच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे शास्त्र म्हणजे विज्ञान. आज मानव पृथ्वीच्या तळापर्यंत किंवा अवकाशापर्यंत पोहचू शकला नाही तरी देखील त्या ठिकाणी काय असू शकेल याची जाणीव विज्ञानच आपल्याला करून देत आहे. मुख्य म्हणजे विज्ञानात असत्यसाठी काहीच जागा नाही. आपल्या संशोधनाला नवा विश्वास मिळतो. - विश्वलता मोवाडे, विद्यार्थिनीमहान संशोधकाचा आदर्श घेण्याचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही रमन यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे स्मरण करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन नवे संशोधन करावे. नव्या गोष्टींची जाणीव जगाला करून द्यावी, असाच संदेश यातून दिला जातो. आज भारताने वैज्ञानिकदृष््या मोठी प्रगती केली आहे. ही निरंतरता कायम राखणे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे काम आहे. - प्रणय चामट, विद्यार्थीसमाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा वापरविज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुखकर होण्यासाठी कसा होऊ शकतो, लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते, हे आपण सिद्ध करून दाखविले आहे. राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिनानिमित्त आपण सर्वांनी विज्ञानाचा जास्तीत जास्त वापर मानवासाठी कसा करता येईल याचा निश्चय करण्याची गरज आहे. - मनोज लामकसे, विद्यार्थी संशोधन क्षेत्रात नव्या संधीआपण गरजेनुसार गोष्टी घडविण्याचा विचार करीत असतो. कुणाला कलेची आवड असते तर कुणाला व्यापाराची. मात्र या दोन्ही गोष्टींचा विस्तार करावयाचा असेल तर विज्ञानाची मदत घेणे गरजेचे आहे. कलेला नवा आयाम देण्यासाठी विज्ञानाची मदत लाभली आहे. दुसरीकडे विज्ञान हे व्यापाराचेही मोठे साधन झाले आहे. याचमुळे विज्ञान संशोधन क्षेत्रात संधी दिसत आहेत. - भाग्यश्री इखाने विज्ञान हे विकासाचे माध्यमविज्ञानाबाबतच्या काही चुकीच्या अवधारणेमुळे भारत आधी जगाच्या मागे राहिलाा. 1930 साली सर सी.व्ही. रमन यांच्या संशोधनाने जगाला खºया अर्थाने भारतीय विज्ञानाच्या नव्या शक्तीचा परिचय करून दिला. आपला देश हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे साक्षरतेत विज्ञानाची भर पडली तर विकास निश्चित आहे. विज्ञान हे एकमेव शस्त्र असे आहे ज्यामुळे भारताच्या विद्यार्थी जगाशी स्पर्धा करण्यास सक्षम ठरू शक तो. - वनश्री वनकर