शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

टीममधला सगळ्यात कच्चा लिंबू कोण?-आपण तर नाही??

By admin | Updated: July 14, 2017 17:17 IST

प्रत्येक टीममध्ये एक कच्चा गडी असतो, पण तो म्हणजे आपण नाही हे कसं ओळखायचं?

-निशांत महाजनसगळीकडे सध्या ले-आॅफची, मनुष्यबळ कपातीची चर्चा आहे. जॉब्ज जाताहेत, आॅटोमेशनमध्ये रोजगार संधी कमी होण्याची शक्यता आहे असं आपण सारं ऐकतो. आणि धास्तावतो. मात्र आपल्या कंपनीत, आपल्या टीममध्ये जेव्हा उत्तम मनुष्यबळाची चर्चा होते, टॅलेण्टेड माणसाची गिनती होते तेव्हा त्यात आपला समावेश होतो का? त्याउलट कच्चा लिंबू, जेमतेमच आहे म्हणून मॅनेजमेण्ट आणि बॉस आपल्याकडे पाहतात? आत्मपरिक्षणच करायचं तर हे प्रश्न अवघड आहेत. कारण आपण आपलं काम मनापासून, चोख करत असतो. नवीन काही शिकत असतोच. मात्र तरीही जर ‘विक’ किंवा ‘कच्चा’ म्हणून जर कंपनी आपल्याकडे पाहत असेल आणि विकेट काढायची वेळ आलीच तर ती आपल्यावर येऊ शकते असं आपल्याला वाटत असेल तर ते गंभीर आहे. म्हणूनच आपण तो कच्चा लिंबू तर नाही ना, हे आपण तपासून पहायला हवं. ते कसं ओळखायचं याची ही एक छोटीशी टेस्ट आहे. आपली आपण करुन घेतलेली बरी, ती ही नियमित.

 

१) जेव्हा जेव्हा कंपनीत नवीन प्रोजेक्ट सुरु होतो, तेव्हा त्यात आपल्या नावाचा विचार होतो का? होत नसेल तर समजा की, आपण विक आहोत.२) जेव्हा एखादी महत्वाची असाईनमेण्ट द्यायची असेल तेव्हा बॉसची पहिली चॉईस आपण असतो का? नाही? तर मग समजा की, आपण विक आहोत.३) कुठलंही नवीन काम आलं, तर आपण स्वत:हून त्यात रस घेतो की काय आता डोक्याला ताप असा आपला अ‍ॅटिट्यूड असतो. आपण नाक मुरडत असू तर समजा की आपण विक आहोत.४) आपण कामाचा कमी, त्यातल्या उत्तम गुणवत्तेचा कमी आणि पगाराचा जास्त विचार करत असू तर समजा की आपण विक आहोत.५) नवीन स्किल्स आपल्याला येतात का? आपल्याला कॉन्फिडन्स आहे की, की काय वाट्टेल ते झालं तरी आपण नव्या काळातही टिकून राहू, तो असेल तर उत्तम. नसेल तर समजा की, आपण अत्यंत कच्चे आहोत आणि आपली विकेट कधीही जाऊ शकते.