शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

​जॉब इंटरव्ह्युवची तयारी करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 22:55 IST

काही बाबींकडे नीट लक्ष दिले तर आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाणे काही अवघड गोष्ट नाही.

नोकरीची मुलाखत म्हटले की सर्वांनाच टेन्शन येते. परीक्षेतील गुणांवर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळते तसे मार्कशीट पाहून नोकरी मिळत नसते.  त्यासाठी इंटरव्ह्युवची (मुलाखत) पायरी यशस्वीपणे ओलांडवीच लागते. शैक्षणिक पात्रता असुनही अनेक जण मुलाखतीमध्ये कमी पडण्याच्या भीतीने निराश होतात.पण असे निराश न होता काही बाबींकडे नीट लक्ष दिले तर आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाणे काही अवघड गोष्ट नाही. कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायचे ते सांगणारा हा लेख आहे.* मुलाखतीच्या आधीची तयारी1. सखोल अभ्यास : ज्या पदासाठी तुम्ही मुलाखत देणार असाल त्याची सखोल माहिती करून घ्या. कंपनी आणि तेथील लोकांबद्दल आगोदरच थोडी रिसर्च करा. 2. मुलाखतीचा पूर्वसराव : प्रत्येक मुलाखतीमध्ये काही प्रश्न ठरलेले असतात. ‘तुमचे गुण कोणते?’ ‘तुम्ही या पदासाठी कसे योग्य आहात’ वगैरे वगैरे. या प्रश्नांची व्यवस्थित उजळणी करून करा. मोठ्या आवाजात प्रश्नांचा सराव करा.3. अडचणीत आणणारे प्रश्न : रेझ्युमेमध्ये अशा काही बाबी असतात ज्याबाबत मुलाखतीमध्ये विचारण्याची तुम्हाला भीती वाटत असते. जसे की, शैक्षणिक वर्षात गॅप का पडला? मागील नोकरीमधून का कमी करण्यात आले? सतत नोकरी बदलण्याचे कारण काय? अशा प्रश्नांनी गोंधळून जायचे नसेल तर आगोदरच याची तयारी करा.4. स्वत:बद्दल काय सांगणार? : मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल सांगताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे याची यादीच तयार करा. अनुभव, वैयक्तिक कामगिरी, यश, विशेष कौशल्य असे सगळे व्यवस्थित लिहून काढा आणि प्रॅक्टिस करा.5. स्वत:चे प्रश्न तयार ठेवा: मुलाखती घेणारे तुम्हाला काही प्रश्न विचारण्यास सांगतील. अशा वेळीस काहीच न विचारण्याची घोडचूक करू नका. आधीच विचार करून ठेवलेले दोन-तीन चांगले प्रश्न विचारल्यावर तुमचे ज्ञान आणि त्या पदावर काम करण्याची उत्सुकता दिसून येते.* मुलाखती दरम्यान1. ड्रेस कोड : फॉर्मल ड्रेस कधीही बेस्ट. डोळ्यांना आल्हाददायक रंगाचे प्लेन किंवा लाईनिंगचे शर्ट कधीही उत्तम. तुम्ही कुठे मुलाखत देणार यावरून ड्रेस कोड बदलू शकतो. मात्र, फॉर्मल इज बेस्ट.2. फर्स्ट इम्प्रेशन : मुलाखतीमध्ये पहिले इम्प्रेशन फार महत्त्वाचे असते. त्यामुळे हसतमुखाने प्रवेश करा. उपस्थित सर्वांशी आत्मविश्वासाने हात मिळवा. बसण्याची परवानगी घेऊनच खाली बसा. नम्रपणाने तेथील वातावरणाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करा.3. आय कॉनटॅक्ट : प्रश्न विचाराणाऱ्याकडे नम्रपणे पाहत उत्तर द्यावे. चुकूनही नजर चुकवण्याची चूक करू नका. आपल्या नजरेतूनचा आपला हेतू आणि आत्मविश्वास दिसत असतो. त्यामुळे आय कॉनटॅक्ट फार महत्तवाचा असतो.4. नीट लक्ष देऊन ऐका : मुलाखती दरम्यान तणावाखाली असल्यामुळे आपण केवळ स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष देत असतो. त्यामुळे समोरचा काय विचारतो याकडे थोडे दुर्लक्ष होते. अशावेळी शांत होऊन हळूहळू श्वास घ्या आणि विचारणाºयाच्या प्रत्येक शब्दावर लक्ष कें द्रित करा. त्यामुळे प्रश्न समजण्यात गफलत होणार नाही.5. प्रश्न न समजल्यास : आणि जर खरंच तुम्हाला प्रश्न समजला नसेल. तसे मान्य करून पुन्हा विचारण्याची विनंती करा. अनेकवेळा तुम्हाला कोंडित पकडण्यासाठी ‘ट्रीक क्वेश्चन्स’ विचारले जातात. अशा गुगली प्रश्नांना कशा प्रकारे तुम्ही प्रतिसाद देता यावरून तुमच्या कार्यक्षमतेचे परीक्षण केले जाते.6. जुन्या कंपनीविषयी सकारात्मक बोला : जुन्या आॅफिसबद्दल विचारले असता केवळ सकारात्मक गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुम्ही काय शिकला, तुमच्यामध्ये कशी प्रगती झाली वगैरे वगैरे. यावरून तुम्ही जिथे काम करता तेथील लोकांविषयी तुम्हाला आदर आहे असे दिसून येते.* मुलाखती नंतर1. आभार प्रदर्शन : मुलाखत झाल्यावर सर्वांशी हस्तांदोलन करून तुम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करा. पुढच्या दिवशी जिथे मुलाखत दिली त्या कंपनीला ‘थँक यू लेटर’ पाठवण्यास विसरू नका. असे करण्यामुळे तुमच्याविषयी त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होतो.* अनुभवातून शिका : प्रत्येक मुलाखत यशस्वी होईलच असे नाही. पण निराश न होता त्यातून आपल्या चुका लक्षात घेतल्या पाहिजे. आपण कुठे कमी पडलो आणि त्याऐवजी काय करायला हवे याची नोंद करा. पुढच्या वेळी त्यामध्ये दुरुस्ती करून स्वत:तात सुधारणा करण्याची लढवय्या वृत्ती हवी. विल स्मिथकडून घ्या मुलाखतीचे धडे‘द पर्स्युट आॅफ हॅपिनेस’ या चित्रपटात विल स्मिथने त्यामध्ये रिअल लाईफ क्रिस गार्डनरची भूमिका साकारली आहे. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या क्रिसचा जीवनसंघर्ष आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण बाजूने खचून गेलेला क्रिस जेव्हा ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत नोकरीची मुलाखत द्यायला जातो तेव्हा सांगतो की, मला जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर मी लगेच सांगेन की मला उत्तर माहित नाही. पण मी तुम्हाला विश्वास देईन की, मी त्या प्रश्नाचे उत्तर शोधून तुम्हाला सांगणार. यावरून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे बोला. जे खरे आहे तेच सांगा आणि शिकण्याची तयारी ठेवा.मुलाखतीचा अविस्मरणीय दिवसमला आजही माझ्या नोकरीच्या मुलाखतीचा दिवस चांगला आठवतो. खाजगी कामानिमित्त मुंबईला गेलो असता योगायोगाने मी सध्या काम करत असेलेल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे आले. अशी अनाहुतपणे आलेली संधी सोडायची नव्हती म्हणून मी मुलाखतीला हजर झालो. कार्पोरेट आॅफिसपाहून आपला येथे काहीच चान्स नाही असे वाटले. पण ते विचारत असेलेले प्रश्नांची उत्तरे मी देत गेलो. माहित नसेल तर तसे स्पष्ट सांगितले. तेव्हा एक गोष्ट मला कळाली की, तणावपूर्ण स्थितीत आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. - अमोल भालेरावव्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचामुलाखतीमध्ये केवळ तुमचे ज्ञान नाही तर एकूण व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमता तपासली जाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा केला जातो हे माहित असणे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच नोकरी करणे म्हणजे टीमवर्क असते. इतरांशी तुम्ही कशा प्रकारे जुळवून घेऊ शकता, तुमचा स्वभाव कसा आहे याकडे मुलाखत घेणाºयााचे लक्ष असते. व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजजीवनात एक्स्ट्रा-करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटिज्मध्ये आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. नेतृत्त्वगुण, सृजनशीलता आणि जिद्द-चिकाटी आदी गुण स्वत:मध्ये विकसित करण्यावर भर दिला पाहिजे- शैलेश कोठाळे