शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

घरातले स्वीच बोर्डही सजवता येतात. या दहा आयडिया वापरून तर बघा!

By admin | Updated: May 24, 2017 18:36 IST

घरातले स्वीच बोर्डही आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. त्यासाठी स्वीच बोर्डचा मेकओव्हर करावा लागतो. आणि ते तर एकदम सोपं आहे.

 

- सारिका पूरकर- गुजराथी

आपल्या सर्वांच्याच घरात इलेक्ट्रिसिटीचा स्वीच बोर्ड असतोच. पूर्वी हे स्वीचबोर्ड लाकडी चौकोनी तुकड्यांचे असायचे, परंतु आता हे स्वीच बोर्ड प्लॅस्टिकचे असतात. किती वर्षांपासून या स्वीच बोर्डला आपण आपल्या घरात पाहातो. पण स्वीचबोर्डला हात लागतो तो बटन दाबण्यासाठीच. एरव्ही घराचा लूक चेंज करताना लादीपासून पडद्यांपर्यंत सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यावर नव्यानं हात फिरवला जातो. पण घरातले स्वीच बोर्ड मात्र आहे तसेच राहतात, त्यांच्याकडे पाहिलं की जुनं जुनं वाटतंच. खरंतर हे स्वीच बोर्डही सजवता येतात. त्यांनाही रंगीबिरंगी बनवता येतं. घरातले स्वीच बोर्डही आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. त्यासाठी स्वीच बोर्डचा मेकओव्हर करावा लागतो. आणि ते तर एकदम सोपं आहे.

 

                    

स्वीच बोर्डचा मेकओव्हर कसा कराल?

1) वाशी टेप

बाजारात वाशी टेप मिळतो (विविध रंग आणि डिझाईन्स असतात यावर. जसा आपण टिक्सो टेप वापरतो तसाच असतो) त्याची आकर्षक रंगसंगतीतील रचना बोर्डवर साकारु शकता. उदाहरणार्थ दोन तीन रंगात, दोन तीन डिझाईनचा टेप घ्या. त्याची मांडणी एकाआड करुनही छान डिझाईन तयार होईल. टेप थेट स्वीच बोर्डावरच चिकटवायचा आहे.

2) नकाशे

घरात जुने नकोशे असतील तर ते कापून या स्वीचबोर्डवर बटनभोवती चिकटवून टाका. नकाशे हा घरसजावटीतील महत्वाचा घटक पूर्वीपासून मानला जातो.

3) ग्लिटर्स

बाजारात मिळणारे लिक्विड किंवा पावडर ग्लिटर्स स्वीच बोर्डवर लावले तर बोर्डला कलरफूल आणि ग्लिटरिंग लूक मिळेल. भिंतींच्या रंगसंगतीनुसार ग्लिटर्सचे रंग निवडा म्हणजे अधिक आकर्षक दिसेल.

 

               

4) जॉमेट्रिक पेंटिंग

मास्किंग टेप किंवा पेंटर्स टेपचे तुकडे कापून घ्या. स्वीचबोर्डवर हे तुकडे चौकोनी, त्रिकोणी असे आकार एकत्र गुंफणाऱ्या रचनेत चिकटवा. टेपच्या आतील भागात आवडीचे अ‍ॅक्रेलिक रंग देऊन घ्या. रंग वाळले की टेप काढून टाका. टेप काढल्यावर टेप लावलेला भाग पांढरा दिसेल, या पांढऱ्या भागात आता गडद रंग द्या. म्हणजे डिझाईन आकर्षक दिसेल.

5) डेकोरेटिव्ह पेपर्स

घरात काही गुळगुळीत कागदांचे मासिके असतील तर त्याचे कागद कापून स्वीचबोर्डवर चिकटवा. अन्यथा बाजारात सुंदर हॅण्डमेड पेपर्स, क्राफ्ट पेपर्स, डेकोरेटिव्ह पेपर्स मिळतात ते चिकटवले तरी छान दिसेल. भिंतीसाठी वॉलपेपर्स वापरले जातात, त्याचे काही तुकडेही स्वीचबोर्डवर चिकटवून ते सुंदर बनवता येईल.

6) खडे आणि पेबल्स

बाजारात आकर्षक, चकाकणारे खडे मिळतात. ते खडेदेखील स्वीचबोर्डवर बटनोभोवती चिकटवून वेगळा लूक देता येतो. खड्यांप्रमाणेच विविध आकाराचे, रंगांचे पेबल्सही चिकटवून स्वीचबोर्डला सजवता येतं.

 

                           

 

 

7) क्रोशा वर्क

जर तुम्हाला क्रोशा विणकाम येत असेल तर स्वीचबोर्डच्या आकाराचं विणकाम करुन स्वीचबोर्डला लावू शकता. दिसायलही सुंदर आणि यातून स्वनिर्मितीचा आनंदही मिळतो. हे विणकाम करतानाही आकर्षक रंगसंगतीवर भर द्या. विणकाम करताना स्वीचबोर्डवरील बटनाच्या आकारातील भाग तेवढा मोकळा राहू द्या.

8)शार्पी डिझाईन

मार्कर पेनसारखे शार्पी पेन मिळतात, त्याच्या सहाय्यानं सुंदर डिझाईन तुम्ही थेट स्वीचबोर्डवर साकारु शकता.

9)  कापड

घरात उपलब्ध असलेले, वापरात नसलेले परंतु आकर्षक रंग आणि डिझाइन्सचे कापड कापून स्वीचबोर्डवर मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं चिकटवून टाका. स्वीचबोर्डचा नूर एकदम खुलून जाईल.

10) टिश्यू पेप

स्पार्कलिंग टिश्यू पेपरचे तुकडे कापून ते स्वीचबोर्डवर मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं चिकटवून टाका. स्वीचबोर्डला एकदम अ‍ॅबस्ट्रॅक्ट लूक मिळेल.