शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिताचा बिनामेकअप फोटो आणि आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड

By admin | Updated: July 10, 2017 17:11 IST

सुश्मिता सेननं मेकप नसलेला फोटो इन्स्टाग्रामवर काय टाकला त्याची नेटीझन्समध्ये प्रचंड चर्चा झाली. त्याचं कारण आहे सोशल मीडीयावरचा नवा आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड.

-निशांत महाजन

सुश्मिता सेननं मेकप नसलेला फोटो इन्स्टाग्रामवर काय टाकला त्याची नेटीझन्समध्ये प्रचंड चर्चा झाली. इतकी चर्चा की, सुश्मिता कुठला व्यायाम करते, कुठली क्रीम लावते, काय डाएट करते वगैरे. का? तर तिनं मेकप न केलेला आपला फोटो समाजमाध्यमांत टाकला. आणि त्यात ती अप्रतिम सुंदर दिसत होती. खरंतर रजनीकांत मेकअप न करता मस्त राजरोस फिरतात. आणि तरी त्यांचे फॅन्स त्यांच्या त्याही रुपावर जीव ओवाळून टाकतात. तर मग सुश्मिताच्या याच फोटोची एवढी चर्चा होण्याचं काय कारण असेल? त्याचं कारण आहे सोशल मीडीयावरचा नवा आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड.खरं तर सोशल मीडीयात कधी काय क्लिक होईल आणि कशाची हवा होईल हे सांगताच येत नाही. पण गेले काही दिवस सोशल मीडीयात एक नवा ट्रेण्ड आहे.त्याचं नाव आहे आॅनेस्टी इज ट्रेण्डिंग.म्हणजे काय तर जे जे खरं वाटेल, खरं असेल, प्रामाणिकपणे कबूल केलेलं असेल, पर्सनली खरंखुरं, बरंवाईट मांडलेलं असेल ते ट्रेण्ड होतं.तुम्ही साधं उदाहरण घ्या. आपल्या एखाद्या मित्रानं सेण्टी होत सांगितलेला त्याचा खराखुरा किस्सा आपण चवीनं वाचतो. कुणाची लाइफस्टोरी, कुणाचा स्ट्रगल, कुणाचा कॅमेराला पोज न देता काढलेला फोटो, एखाद्यानं पोज न घेता शेअर केलेला अनुभव, कुणाची तरी उत्सफुर्त कमेण्ट हे सारं आपण फार मन लावून वाचतो.आपण म्हणजे आपण सगळेच. जे जे दिलसे लिहिलेलं, व्यक्त केलेलं, फोटो काढून मांडलेलं असेल ते आताशा सोशल मीडीयात क्लिक होताना दिसतं आहे. कारण तेच, तिथं चकाकणारे फोटो, कचकडी उसन्या शब्दांचे रतिब रोजच चालू असतात. त्या उसन्या शब्दांना आणि खोट्या उमाळ्यांना कुणी विचारत नाही. कारण त्यातलं फोफसेपण सगळ्यांनाच कळून चुकलंय. त्यापेक्षा जे जसं आहे तसं पाहणं, स्वीकारणं आणि त्यातलं अस्सल असणं, रॉ असणं अधिक आकर्षक वाटू लागलं आहे.सुश्मिताचा बिनामेकअप फोटो कसला भारी आहे हे सांगताना आपल्याला हे माहिती असलेलं बरं!