शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचे तरुणाईला घातक वेड

By admin | Updated: July 13, 2017 02:22 IST

नागपूर-कळमेश्वर तालुक्यातील वेणा जलाशयात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे.

प्राची सोनवणेनुकतीच नागपूर-कळमेश्वर तालुक्यातील वेणा जलाशयात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे. अशा वेळी सेल्फीवेड्या पिढीने सेल्फी कुठे, कधी, कसा काढावा, याबाबत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. सेल्फी काढण्याचे व्यसन अनेकांना लागले असून, त्याचे प्रमाण तरु णाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. कोणतीही सवय ठरावीक मर्यादेपर्यंत ठेवावी, तिची अतिशयोक्ती घातक ठरू शकते.सेल्फी काढला न काढला तोच तो फोटो फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, फ्लिकर, गुगल प्लस, टिंबलर, मायस्पेस, स्नॅपचॅट, वुईचॅट, हाइक अशा सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करण्याची क्रेझ तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येते. सर्व वयोगटांत सेल्फीचा नाद वाढत असून, त्यात स्वत:च्या किंवा दुसऱ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत आहे. या आधीचे शतक हे दारू-ड्रग्ज आदी व्यसनांचे होते. मात्र, एकविसावे शतक हे ‘बिहेविअरल अ‍ॅडिक्शन’चे असणार आहे. माणूस आणि तंत्रज्ञान या नात्यामधल्या ताण-तणावाचा हा परिपाक आहे. तंत्र आणि तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय. मुलांचा कुटुंबीय आणि शेजाऱ्यांशी संवाद कमी होतोय. वागणूक विक्षिप्तपणाकडे झुकू लागली आहे. सगळ्यांशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद होत असल्यामुळे प्रत्यक्ष संवादासाठी, सामाजिक व्यवहारांसाठी लागणाऱ्या कौशल्याचा त्यांच्याकडे अभाव निर्माण होऊ लागला आहे. पालकदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत.सेल्फी हे तरु णांमध्ये वाढते फॅड आत्ता आजार बनत असल्याने या पिढीला कसा आवर घालायचा? हा पालक आणि शिक्षकांसमोरचा मोठा प्रश्न आहे.