शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोल्का डॉटस ही फॅशन जुनी किंवा कालबाह्य होणं शक्यच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:40 IST

एखाद्या विशिष्ट प्रसंगी विशिष्टच  ड्रेस  लागतो. पोल्का डॉटस ही फॅशन अशा विशिष्ट प्रसंगी भाव खावून जाते. आणि पोल्का डॉटस घालणारेही ‘सेंटर आॅफ अट्रॅक्शन’ असतात.

ठळक मुद्दे* 1928 साली डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर मिनी माऊसनं लाल कपड्यांवर पोल्का डॉट्स असा अवतार घेऊन लोकांना भुरळ पाडली. आणि त्यानंतर या पोल्का डॉट्सनी फॅशन इंडस्ट्रीत एकच धुमाकूळ घातला.* भारतात साधारणत: 70 च्या दशकात पोल्का डॉट्सची फॅशन मोठ्या जोमानं पसरण्याचं श्रेय जातं बॉबी पिक्चरला.* हिरोंनाही बॉबी प्रिंट्सचे शर्ट वापरण्याचा आणि त्यावर टायऐवजी बो लावून मिरवण्याचा मोह आवरला नाही. अनेक चित्रपटात नटांनीही बॉबी प्रिंट्सचे शर्ट घातल्याचे दिसून येते.

- मोहिनी घारपुरे - देशमुखपोल्का डॉट्स किंवा बॉबी प्रिंट्स आज आठवण्याचं कारण म्हणजे, आज व्हॅलेन्टाईन्स डे.. ग्लॅमडॉल वगैरे नसलेल्या साध्या सामान्य मुलींच्या वॉर्डरोबमध्ये पोल्का डॉट्सवाला एखादा तरी टॉप, कुर्ती, मॅक्सी, गाऊन हमखास असतोच. आणि विशेष म्हणजे, आजसारख्या विशेष प्रसंगासाठी मुली हमखास तो राखून ठेवतात.तर, फॅशनच्या जगतात या पोल्का डॉट्सनी 1926 मध्ये प्रवेश केला. तत्कालीन मिस अमेरिका असलेल्या मॉडेलचा पोल्का डॉट्स असलेल्या स्विम सुटमधला फोटो झळकला आणि सगळ्या जगाचं या पोल्का डॉट्सकडे लक्ष वेधलं गेलं. त्यानंतर 1928 साली डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर मिनी माऊसनं लाल कपड्यांवर पोल्का डॉट्स असा अवतार घेऊन लोकांना भुरळ पाडली. आणि त्यानंतर या पोल्का डॉट्सनी फॅशन इंडस्ट्रीत एकच धुमाकूळ घातला. अगदी 1930 पर्यंत, म्हणजे दोन वर्षातच अमेरिकेच्या बाजारपेठेवर या पोल्का डॉट्सचंच साम्राज्य निर्माण झालं होतं.

 

पोल्का डॉट्स एंड मूनबीम्स हे 1940 साली फ्रँक सिनात्राचे गाणेही गाजले आणि त्या गाण्याने अमेरिकेची पोल्का डॉट्सची क्रेझ जगासमोर आणली.

1951 मध्ये मर्लीन मन्रोचा पोल्का डॉट्सवाल्या बिकीनीतला फोटो झळकला आणि पुन्हा एकदा फॅशनच्या दुनियेत धूम झाली. व्होग मासिकानं तर पोल्का डॉट्सची कित्येकदा दखल घेतली. जापनीज आर्टिस्ट यायोई कुसामा यांच्या कलाकृतीत मोठ्या संख्येने झळकणारे पोल्का डॉट्स यांनी जगाला थक्क करून सोडले आणि 60 च्या दशकात तर याच पोल्का डॉट्सनी जगाला यायोई कुसामांची ओळख करून दिली. ‘आपली पृथ्वी ही या विशाल विश्वपटलावर जणू एक पोल्का डॉट आहे’ असा वेगळाच विचार यायोर्इंनी जगाला दिला.

 

 

पोल्का शब्दाचा अर्थच पॉलिश वुमन असा होतो. झेकमध्ये पोल्का शब्दाचं भाषांतर, लहान मुलगी किंवा छोटीशी स्त्री असं होतं आणि त्यामुळेच हे डॉट्स आॅटोमॅटीकली महिलांच्या फॅशन जगतावर राज्य करताना दिसतात.

असं असलं तरीही, पुरूषांनीही या पोल्का डॉट्सला पसंती दिल्याची साक्ष इतिहास देतो. 1962 मध्ये मार्व्हल कॉमिक्सने ‘पोल्का डॉट मॅन’ या सुपरहीरोला जन्म दिला. त्यानंतर 1965 मध्ये बॉब डिलॅन हिरवा पोल्का डॉटेड शर्टमध्ये झळकला आणि ही फॅशन पुरूषांनीही आपलीशी केली.

भारतात साधारणत: 70 च्या दशकात पोल्का डॉट्सची फॅशन मोठ्या जोमानं पसरण्याचं श्रेय जातं बॉबी पिक्चरला. बॉबी फिल्ममधल्या डिंपल कपाडीयानं घातलेल्या पोल्का डॉट्सवाल्या ड्रेसमुळे भारतात या प्रिंटचं नावच बॉबी प्रिंट पडलं. या बॉबी प्रिंट्स आपल्याकडेही तूफान लोकप्रिय झाल्या. हिरोंनाही बॉबी प्रिंट्सचे शर्ट वापरण्याचा आणि त्यावर टायऐवजी बो लावून मिरवण्याचा मोह आवरला नाही. अनेक चित्रपटात नटांनीही बॉबी प्रिंट्सचे शर्ट घातल्याचे दिसून येते.

तर असे हे पोल्का डॉट्स. साधे, सिंपल आणि तरीही प्रचंड मोहक. काय जादू आहे या पोल्का डॉट्सची माहीत नाही पण कपड्यांवर हे डॉट्स पसरले की रूप खुलतं हे नक्की. मग ती अगदी ऐश्वर्या राय असो किंवा आपण स्वत:!