शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

केस स्ट्रेट हवेत? मग घरी केलेलं हे क्रीम लावूनच पाहा..

By admin | Updated: June 28, 2017 14:57 IST

तुमच्या सौंदर्यालाही लावील हे क्रीम चार चॉँद!

- मयूर पठाडेआपल्या, विशेषत: महिलांच्या सौंदर्याचं रहस्य खासकरून त्यांच्या केसांवर अवलंबनू असतं. तुमचे केस जर चांगले असतील तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरही चार चॉँद लागतात आणि चारचौघांत तुम्ही चांगलेच उठून दिसता. पण अनेक तरुणी, महिलांचे केस कुरळे असतात आणि हे कुरळे केस सरळ कसे करायचे हा त्यांच्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न असतो.हे केस सरळ करण्यासाठी प्रत्येक तरुणी मग आपापल्या पद्धतीनं अनेक प्रयोग करते. त्यासाठी बऱ्याचदा केमिकल्सचाही वापर केला जातो. या केमिकल्सच्या वापरानं केस सरळ होतातही, पण त्यातला सर्वात मोठा धोका म्हणजे हा उपाय तात्पुरताच ठरतो. एवढा खर्च करून, वेळ देऊन फायदा तर होत नाहीच, उलट केस आणखी खराब होतात, बेजान होतात, केसांचा कोरडेपणा, शुष्कपणा वाढतो आणि त्या केसांची पार रयाच जाते. अनेक तरुणी तर रोज हेअर ड्रेसिंगही करतात. त्यामुळे केसांची आणखीच वाट लागते. मग करायचं तरी काय? काहीही केलं तरी केसांची रया जाणार, त्यांची अधिकाधिक काळजी घ्यावी लागणार आणि चेहऱ्याचं सौंदर्य.. तेही कमी कमीच होत जाणार.. निदान तसं प्रत्येक तरुणीला वाटतं.

 

त्यासाठी एक अफलातून उपाय आहे, तो म्हणजे घरच्याघरी क्रिम तयार करायचं आणि ते आपल्या केसांना लावायचं. रासायनिक पदार्थांमुळे केसांचं जे नुकसान होतं, तो धोका या घरी केलेल्या क्रीममध्ये नाही. शिवाय त्याचे साईड इफेक्ट्सही नाहीत. कुरळे केस सरळ करण्याचा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.करून तर पाहा.. तुम्ही म्हणाल, ये बहोत सही है...

 

काय सामुग्री लागेल?१- एक कप नारळाचं दूध२- अर्धा कप कॉर्न स्टार्च३- तीन टेबलस्पून आॅलिव्ह आॅईल४- एक टेबलस्पून लिंबूरस५- एक टेबलस्पून अ‍ॅलोवेरा जेल६- व्हिटॅमिन ए च्या तीन कॅप्सूल्सकसं वापराल?१- एका भांड्यात अगोदर नारळाचं दूध टाका. त्यात कॉर्न स्टार्च टाका. थोडं हलवा आणि मंद आचेवर ठेवा२- आता त्यात आॅलिव आॅईल, लिंबू रस आणि अ‍ॅलोवेरा जेल टाकून ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करा. ३- आपण व्हिटॅमिन ए च्या ज्या तीन कॅप्सूल्स घेतल्या आहेत, त्या या मिश्रणात टाका आणि हळूहळू ढवळत राहा, जोपर्यंत या साऱ्या मिश्रणाचं क्रीम बनत नाही.४- हे सारं मिश्रण एका कंटेनरमध्ये टाका.५- आता हे क्रिम आपल्या केसांवर सावकाश लावा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे क्रिम केसांवर वरून खाली अशा पद्धतीनं लावा.६- आता शॉवर कॅप लावा. काही वेळानंतर शॅम्पूनं केस धुवा. ७- केसांना ब्लो ड्राय करा. ८- झाले तुमचे केस स्ट्रेट!