मोगलीची आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 04:15 IST
अभिनेत्री फ्रीडा पिंटोने ‘जंगल बुक : आॅरिजिन्स’ या चित्रपटात मी मोगलीच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले.
मोगलीची आई
अभिनेत्री फ्रीडा पिंटोने ‘जंगल बुक : आॅरिजिन्स’ या चित्रपटात मी मोगलीच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले. रुडयार्ड किपलिंग उपन्यासवर हा चित्रपट आधारित असून, दत्तक घेतलेल्या मोगलीच्या आईची भूमिका साकारणे खुपच रोमांचक असल्याचे ती सांगते. ‘द जंगल बुक’ हे पुस्तक मी यापूर्वीच वाचले आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी याच नावाने भारतात टीव्हीवर मालिका देखील सुरू होती. त्यामुळे मला या पात्राबाबत बºयापैकी कल्पना होती असेही फ्रिडाने सांगितले. आॅक्टोबर २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.