मिशेल ओबामा यांचा छंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:02 IST
अमेरिकेच्या फस्र्ट लेडी मिशेल ओबामा सर्वसामान्य नागरिकांपासून दिग्गज आसामी...
मिशेल ओबामा यांचा छंद
अमेरिकेच्या फस्र्ट लेडी मिशेल ओबामा सर्वसामान्य नागरिकांपासून दिग्गज आसामींमध्ये लोकप्रिय आहेत. मागील ७ वर्षांपासून 'फस्र्ट लेडी ऑफ अमेरिका' असलेल्या मिशेल यांचे या मानाला साजेसे वर्तन कायम असते. व्हाईट हाऊसबद्दल त्यांना असलेला जिव्हाळा अमेरिकन नागरिकांपासून लपून राहिलेला नाही. अमेरिकेतील सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मिशेल ओबामा यांचे छंद आहेत. विशेष म्हणजे, व्हाईट हासऊसच्या साऊथ लॉन्समध्ये त्या आपले छंद जोपासतात. यात वेगळेपण असे की, साऊथ लॉन्स हा व्हाईट हाऊसचा मागील भाग असून ती जागा याआधी कोणीही वापरली नव्हती. याआधीच्या फस्र्ट लेडींनी क्वचितच साऊथ लॉन्सचा वापर केला. मात्र, मिशेल यांना हे लॉन्स फार प्रिय आहे. त्यांना येथे हुला हूप्स खेळणे, वाचन करणे, व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर कुटुंबासह फिरणे आवडते. शिवाय मिशेल यांनी येथे बीट आणि गाजर लावले आहेत. एवढेच नव्हे तर, या लॉन्सवर मिशेल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.