जॅकी चैन भारत दौºयावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 17:07 IST
अॅक्शन स्टार जॅकी चैन आगामी भारतीय-चीनी चित्रपट ‘कुंग फू योग’च्या शूटिंगसाठी सध्या भारत दौºयावर आला आहे.
जॅकी चैन भारत दौºयावर
अॅक्शन स्टार जॅकी चैन आगामी भारतीय-चीनी चित्रपट ‘कुंग फू योग’च्या शूटिंगसाठी सध्या भारत दौºयावर आला आहे. तो २१ मार्चपासून भारत दौºयावर असून, बॉलीवुड अभिनेता सोनू सूद आणि अमायरा दस्तूर या चित्रपटात झळकणार आहेत. यावेळी सोनूने सांगितले की, जॅकी चैन जयपुर येथे मुक्कामाला असणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शुटिंग पुर्ण झाले असून, उर्वरित भागाच्या शुटिंगसाठी पुढचे १५ दिवस जॅकी भारतातच असणार आहे. त्यानंतर उर्वरित शुटिंग बीजिंग येथे होईल. हा चित्रपट जबरदस्त अॅक्शनपट असून, याच वर्षाच्या आॅक्टोंबर महिन्यात रिलीज होणार आहे. यावेळी सोनुने जॅकीचे कौतुक करताना सांगितले की, जॅकी चैनसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. तो अतिशय विन्रम असून, मेहनती आहे.