शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी -समारंभात जरा हटके दिसायचंय मग अ‍ॅसिमेट्रिक ड्रेस आणि अ‍ॅसिमेट्रिक अ‍ॅक्सेसरीज ट्राय करा. नक्की अ‍ॅट्रॅक्टिव्ह दिसाल!

By admin | Updated: July 4, 2017 18:13 IST

स्टायलिश कपडे वापरण्याचा आनंद उपभोगायचा असेल तर अँसिमेट्रिक ड्रेस घालून बघायला हवेत .

 

- मोहिनी घारपुरे-देशमुख

अ‍ॅसिमेट्रिक ड्रेस या नावानेच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु अलिकडे फॅशन जगतात हे अ‍ॅसिमेट्रीक ड्रेसेस खूप लक्षवेधी ठरत आहेत. विशेषत: पार्टीजला जाताना हे अ‍ॅसिमेट्रिक ड्रेसेसच घालण्यास विशेष पसंती दिली जाते.

अ‍ॅसिमेट्रिक ड्रेसच  का?

* हे ड्रेसेस अत्यंत क्लासिक दिसतात.

* या ड्रेसची धाटणीच अशी असते की त्यामुळे लुकला एकदम उठाव येतो अणि तुम्ही वयापेक्षा तरूणच भासू लागता.

* स्किनी जीन्स, लेगिंग्स यावर हे ड्रेसेस शोभून दिसतात. तसेच वयापरत्त्वे  सुटलेलं पोटही हे ड्रेस आरामात झाकून टाकतात. त्यामुळेच हे ड्रेसस चाळीशीच्या घरातील महिलांनी तरूण दिसण्यासाठी आवडीनं घातले तर त्यात फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

 

प्रकार किती?

अ‍ॅसिमेट्रीचे स्वत:च इतके प्रकार आहेत की त्याचा वापर करून बनवलेल्या ड्रेसेसमध्ये प्रचंड व्हरायटी आणि युनिकनेसही आढळतो. टॉप्स, कुर्तीज, ट्यूनिक्स, कोट्स, स्कर्ट्स अशा सर्वच प्रकारच्या कपड्यांमध्ये अ‍ॅसिमेट्री खूप चांगल्या पद्धतीनं इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. त्यामुळे नवनवीन प्रकारचे आणि त्याहूनही स्टायलिश कपडे वापरण्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो.

 

               

अ‍ॅसिमेट्रिक अ‍ॅक्सेसरीज

अ‍ॅसिमेट्रिक अ‍ॅक्सेसरीज हा देखील एक स्वतंत्र सेगमेण्ट फॅशनच्या दुनियेत लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे कानातले, गळ्यातले, अंगठी, बेल्ट, अँक्लेट्स या सर्व प्रकारांमध्ये अ‍ॅसिमेट्री वापरून तऱ्हेतऱ्हेची ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या प्रकारचे कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजच्या चाहत्यांचीही संख्या प्रचंड मोठी आहे. या कपड्यांचे विशेष म्हणजे एखादा असा कट या कपड्यांना दिलेला असतो की त्याने ड्रेस घालणाऱ्या व्यक्तीच्या सौंदर्यात भरच पडते.

 

    

इंटरनेटवर सर्च केल्यास शेकडो प्रकारचे अ‍ॅसिमेट्रिक ड्रेसेस सापडतील तसेच तुम्हाला हवे असल्यास काही साईट्सवरून त्यांची खरेदीही करता येईल. विशेषत: वन शोल्डर ड्रेसेस, अ‍ॅसिमेट्रिक स्कर्ट्स यांची प्रचंड चलती आहे. एक्सेसरीजमध्येही अ‍ॅसिमेट्रिक कानातल्यांना प्रचंड मागणी आहे. पाश्चात्य देशांमध्ये, या अ‍ॅसिमेट्रिक ड्रेसेसच्या चाहत्यांचा एक वेगळा वर्ग असून तिथे हमखास या प्रकारच्या ड्रेसेसना प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.