शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

​फॅशनेबल लॅगिंन्सचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 20:32 IST

येत्या पावसाळ्याचा विचार करता तरुणींना भुरळ घालणाºया विविध प्रकारचे लॅगिंन्स बाजारात आले आहेत.

येत्या पावसाळ्याचा विचार करता तरुणींना भुरळ घालणाºया विविध प्रकारचे लॅगिंन्स बाजारात आले आहेत. सेलेब्रिटीज आणि डिझायनर्स यांनीसुद्धा लॅगिंन्सला पसंती दिली आहे. इतर कपड्यांच्या तुलनेने पावसाच्या पाण्यात लॅगिंन्सची जास्त ओली होण्याची भीती नसते. चिखल, गाळ यापासून आपल्या कपड्याचे संरक्षण होत असते. एवढेच नव्हे तर जीन्सला चांगला पर्याय आणि घालून वावरताना जाणवणारा सुटसुटीतपणा यामुळे लॅगिंन्स  फॅशनचा ट्रेंड वाढत आहे.पार्टी वेअर लॅगिंन्स पार्टी म्हटले म्हणजे प्रयेकाला वाटते की आपला प्रभाव पडावा. त्यासाठी एखाद्या पार्टीला किंवा डिस्कोमध्ये जाताना छान, स्टायलिश टुनिक किंवा क्रॉप टॉप घालायचा असल्यास त्यासोबत नेहमीच्या कॉटन किंवा लायक्राच्या लॅगिंन्स शोभून दिसत नाहीत. त्यासाठी खास पार्टी स्टाईल हवेत. लॅगिंन्स सिक्वेन्स लॅगिंन्स, लेदर लॅगिंन्स, डिस्को लॅगिंन्स या प्रकारांत मोडतात. नावाप्रमाणे सिक्वेन्स लॅगिंन्स पूर्णपणे सिक्वेन्सनी भरलेल्या असतात. डिस्को लॅगिंन्सना सेल्फ शाईन असते. या लॅगिंन्सच दिसायला स्टायलिश असतात, त्यामुळे अगदी सिम्पल टुनिक किंवा टॉपसोबतसुद्धा या ग्लॅमरस दिसतात. फुटेड अ‍ॅण्ड स्ट्रीप स्टाईल लेगिंन्स बºयाचदा चालताना लॅगिंन्स काही प्रमाणात वर सरकते किंवा हिल्स घातल्यावर लॅगिंन्सची उंची आखूड दिसते. मात्र यावर फुटेड आणि स्ट्रीप स्टाईल लॅगिंन्स एक उत्तम पर्याय आहेत. या लेगिंग्ज थेट पायाच्या तळव्यापर्यंत जातात. स्ट्रीप स्टाईलमध्ये लॅगिंन्सला खालच्या बाजूने स्ट्राईप असते, तर फुटेड लॅगिंन्स स्टोकिंगप्रमाणे पूर्ण पाय झाकते. या लॅगिंन्स हिल्ससोबत शोभून दिसतात. पार्टीसाठीतर या लॅगिंन्स एक अफलातून पर्याय आहेत. स्टायलिश टुनिक, टॉप्ससोबतही घालता येऊ शकते तर फुटेड लॅगिंन्स ड्रेस, स्कर्टसोबत इनर म्हणून वापरता येतात. काफ लेंथ लॅगिंन्स येत्या पावसाळ्याचा ऋतू लक्षात घेता काफ लेंथ लॅगिंन्स तुमच्या जवळ हव्याच. पण फक्त पावसाळ्यातच नव्हे तर, इतर ऋतूंमध्येसुद्धा या प्रकारच्या लॅगिंन्स दिसायला फॅशनेबल असतात. साधारणत: गुडघ्याच्या चार-पाच इंच खालपर्यंत या लॅगिंन्सची लांबी असते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल उडणे, पाण्यात पाय पडून लॅगिंन्स ओले होण्याची समस्या नसते.  कॉटन, लायक्रा कापडांमध्ये वेगवेगळ्या रंगात आणि पिंर्ट्समध्ये या लॅगिंन्स उपलब्ध आहेत. अँकल लेंथ लेगिंन्स आपण रोज वापरतो त्या लॅगिंन्स अँकल लेंथ असतात, साधारत: त्यांची उंची पायाच्या घोटापर्यंत असते. कॉटन, लायक्रा, स्पेंडेक्स कापडात या लॅगिंन्स असतात. कॉटनच्या लॅगिंन्सना चुडीदार पद्धतीने खालच्या बाजूला चुण्यादेखील असतात. वेगवेगळ्या रंगांत, पिंर्ट्समध्ये या लॅगिंन्स उपलब्ध आहेत. कॉटनच्या लॅगिंन्स कुर्तीसोबत घालायला उत्तम असतातच, पण लायक्रा लॅगिंन्स लांब शर्ट, टुनिक, टॉप्ससोबतसुद्धा घालता येतात. जेगिंगजीन्स घालायला प्रत्येकाला आवडते, मात्र उन्हाळ्यातील गरमीमुळे ती नकोशी वाटते. यावर उत्तम पर्याय जेगिंग आहे. जेगिंग हा लेगिंगचाच प्रकार असून त्या दिसायला जीन्सच्याच असतात. लायक्राच्या लेगिंग ह्या सुटसुटीत असतात आणि वेगवेगळ्या ड्रेसेससोबत मॅच होतात. लॅगिंन्स विकत घेताना ही काळजी घ्या  लॅगिंन्स विकत घेताना त्यांच्या कापडाचा दर्जा तपासून घ्या. कमी व हलक्या दर्जाच्या कापडाची शिलाई उसविण्याची शक्यता असते. आपली उंची कमी असेल तर काल्फ लेंथ, मोठया छपाईचे लॅगिंन्स वापरू नका. तसेच अतिबारीक असाल तर उभ्या पट्ट्यांच्या छपाईच्या लॅगिंन्स वापरू नका. जास्त फिटेड लॅगिंन्सामध्ये पायाचा आकार दिसून येतो. लेगिंग ब्राईट पिंर्ट्स किंवा पॅटर्नची असेल तर टुनिक, कुर्ता साधाच वापरायला हवे.लॅगिंन्स हे कंफर्टेबल फिट आणि स्मार्ट लुक देते. त्याच प्रमाणे त्यातील वेगवेगळ्या फॅब्रिक व्हरायटीमुळे आमच्यासारख्या फॅशन फिल्ड मधील तरुणीही लॅगिंन्सलाच पसंती दर्शवितात. त्याचप्रमाणे बदलत्या काळानुसार लॅगिंन्समध्ये होणारे विविध बदल जसे की, लॅगिंन्सचे विविध पॅटर्न्स, कलर्स, टेक्चर्स त्यातील विविध प्रिंट्स ह्या चांगला लुक देतात. म्हणूनच लॅगिंन्स  वापरण्याकडे दिवसेंदिवस तरुणीचा कल वाढत आहे. -यशस्विनी त्रिपाठी,  स्टुडंट, फॅशन डिझायनरआजच्या बदलत्या फॅशननुसार लॅगिंन्स हे एक चांगले व परवडेबल आॅप्शन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीहीलॅगिंन्सचा वापर करू शकतात. जीन्सपेक्षाही लॅगिंन्समध्ये जास्त कंफरटेबल फिल होते. त्याचप्रमाणे हवी ती प्रिंट्स आणि व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. इंडियन आणि वेस्टर्न वेअरमध्येही लॅगिंन्स  हे एक उत्तम पर्याय आहे. आणि म्हणूनच मार्केटमधील विविधरंगी लॅगिंन्स  हे सर्वांचेच आकर्षण केंद्र ठरत आहे.    -भाग्यश्री शिंदे,  स्टुडंट, फॅशन डिझायनर