शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

टपोऱ्या आणि पाणीदार डोळ्यांसाठी..

By admin | Updated: June 29, 2017 16:37 IST

- डोळ्यांना कायमचा चष्मा लागू नये असं वाटत असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात..

मयूर पठाडेडोळे निसर्गत:च सुंदर, टपोरे आणि पाणीदार असतील तर ठीक, पण ते खरोखरच सुंदर राहण्यासाठी, किमान डोळ्यांना कायमच चांगलं दिसावं यासाठी आपण काय करतो? - बहुदा काहीच नाही. जेव्हा दृष्टी कमी कमी व्हायला लगते, डोळे दुखायला लागतात किंवा चष्मा लागायची वेळ येते त्याचवेळेस आपल्याला जाग येते.खरंतर डोळ्यांच्या सौंदर्यासाठी आणि आपली दृष्टी चांगली राहण्यासाठी घरच्याघरीही अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. खरं तर यासाठी आपल्याला करायचंही काहीच नाहीए. आपल्या आहारात काही गोष्टी मात्र आपल्याला नियमितपणे घ्याव्या लागतील.डोळ्यांसाठी गाजरं चांगली असतात हे आता सगळ्यांनाच माहीत आहे, पण आणखीही अशी अनेक फळं आणि खाद्यपदार्थ आहेत, जी तुम्ही नियमितपणे खाल्लीत तर तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य आणखीच वाढेल.डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी काय खाल?

 

१- हिरवागार पालक, ब्रोकोली, कोबी, सलाड.. यासारख्या पदार्थांमध्ये अ‍ॅँटीआॅक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. याशिवाय तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठीही त्यांचा खूप उपयोग होतो. हे पदार्थ खाल्ल्यामुळे मोतीबिंदूची शक्यताही खूपच कमी होते. २- अंड्यांत जो पिवळा बलक असतो, तोही डोळ्यांसाठी खूपच चांगला मानला जातो. डोळ्यांची दृष्टी खालावण्यापासून याची मदत होते. ३- आंबटसर चवीची जी फळं आहेत, ती नियमितपणे खाल्ल्यानंही डोळ्यांची चमक कायम राहते आणि दृष्टी टिकून राहण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. द्राक्षं, लिंबू, संत्री.. यासारखी फळं डोळ्यांच्या सौंदर्यासाठी उपयुक्त सिद्ध झाली आहेत. यामध्ये असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे मोतीबिंदूची शक्यताही नगण्य होते.

 

४- रोज तुम्ही नियमितपणे सातआठ बदाम खात असाल तर त्यानंही डोळ्यांचं तेज वाढण्यासाठी मदत होते. ५- आपल्या डोळ्यांचं साौंदर्य आहे त्यापेक्षा आणखी खुलवायचं असेल, तर मांसाहार करणाऱ्यांपैकी ज्यांना मासे आवडतात, त्यांनाही त्याचा फार उपयोग होऊ शकतो. यातील फॅटी अ‍ॅसिड डोळ्यांचं संरक्षण तर करतंच, पण आपली दृष्टीही तेज राखतं.६- याशिवाय मकाही डोळ्यांसाठी चांगला समजला जातो.हे सारे पदार्थ रोज खा, असं नाही, पण काहीही न करता, आपलं आरोग्यही चांगलं राखलं जात असेल आणि डोळ्यांचं सौंदर्यही वाढत असेल, तर हे उपाय करून पाहायलाच हवेत.