अष्टपैलू ट्विंकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:57 IST
अभिनेत्री आणि आता एका अभिनेत्याची पत्नी अशी ओळख असलेल्या ट्विंकल खन्नाची आता एक वेगळी ओळखही समोर येत आहे.
अष्टपैलू ट्विंकल
अभिनेत्या जोडप्याची मुलगी, स्वत: अभिनेत्री आणि आता एका अभिनेत्याची पत्नी अशी ओळख असलेल्या ट्विंकल खन्नाची आता एक वेगळी ओळखही समोर येत आहे.लेखिका आणि उद्योजिका ही तिची नवी ओळख असून, आतापर्यंतच्या सर्वच आघाड्यांवर तिची यशस्वी वाटचाल चालू आहे. मिसेस फनीबोन्स या तिच्या पुस्तक प्रकाशनानंतर तिने आता गृहसजावटीसाठी लागणार्या वस्तूंचा संग्रह बाजारात आणलेला आहे. तो 'द व्हाईट विन्डो' या ब्रॅँन्डने ते प्रसिद्ध आहे.या व्यवसायाच्या लाँचिंगप्रसंगी तिचे खास मित्र असलेले सुजान खान, सीमा खान, नीलम कोठारी आणि महादीप कपुर हे तिच्या नव्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर होते.