शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

1,300 कोटींचा लातूर, नांदेड ‘नीट पॅटर्न’

By धर्मराज हल्लाळे | Updated: December 17, 2023 09:54 IST

राजस्थानमधील  कोटा या शहरानंतरच नव्हे तर त्याआधी लातूर, नांदेडचे नाव वैद्यकीय प्रवेशपरीक्षांसाठी ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे.

- धर्मराज हल्लाळेवृत्तसंपादकसरकार दरबारी मराठवाड्याच्या विकासावर सातत्याने चर्चा होत राहते. उद्योग, दळणवळण आणि कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकलेल्या कृषी क्षेत्राच्या विवंचना कायम आहेत. शिक्षणातही संशोधन, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय संस्थांची प्रतीक्षाच आहे. रोजगारनिर्मिती करू शकेल अशा दर्जाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अजूनही मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या महानगरांकडे जावे लागते. परंतु, शालेय, उच्च माध्यमिक शिक्षणात मराठवाड्याने गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यातही राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेची तयारी, त्याचा निकाल आणि वैद्यकीय प्रवेशामध्ये मराठवाडा हे देशाचे केंद्र बनले आहे. आता राजस्थानमधील  कोटा या शहरानंतरच नव्हे तर त्याआधी लातूर, नांदेडचे नाव वैद्यकीय प्रवेशपरीक्षांसाठी ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे.

शुल्काशिवाय इतर खर्च दुप्पट; उलाढाल आणखी वाढणार...लातूर आणि नांदेड हे नीट, जेईईच्या तयारीचे मुख्य केंद्र बनले आहेे. लातूरमध्ये साधारणपणे ३० हजार विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षांच्या तयारीसाठी येतात. अकरावी, बारावी आणि रिपिटर्स अशी एकत्रित संख्या आणि प्रत्येकी किमान ५० ते ७५ हजार रुपये शुल्क अशी गोळाबेरीज केली तर किमान दीडशे ते दोनशे कोटी रुपये शुल्क होते. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे वर्षभराचा निवास, भोजन आणि इतर खर्च असे प्रत्येकी दीड लाख याप्रमाणे साडेचारशे कोटींची उलाढाल होते. अशीच उलाढाल नांदेडमध्ये होत आहे. ज्यामुळे लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून किमान १,३०० कोटी वा त्यापेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. एकंदर आर्थिक आलेखाइतकाच मराठवाड्याच्या गुणवत्तेचा आलेखही उंचावत आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातून मुंबई, पुण्यात स्थायिक झालेले पालक नीट, जेईईसाठी मराठवाड्यात येत आहेत. लातूर-नांदेडमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी दिसत आहेत.

२०२३ मध्ये वैद्यकीय प्रवेशात मराठवाड्याचा टक्का किती? 

 महाराष्ट्रात वैद्यकीयच्या जागा सुमारे ११ हजार, त्यात गुणवत्तेनुसार १५ टक्के केंद्रीय कोटा आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा वगळल्या तर राज्यातील ७ हजार जागांचा ताळेबंद मांडता येईल. लातूरमधून बारावी बोर्डाची तसेच नीटच्या लातूर केंद्रावरून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून सुमारे १,३०० विद्यार्थी यंदा शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेशित झाले आहेत. जवळपास तितकीच प्रवेशित संख्या नांदेडचीही आहे.बारावी बाेर्ड परीक्षा आपल्या गावात मात्र तयारी लातूर-नांदेडमध्ये केलेल्यांची संख्या अधिक आहे. त्याचा आधार नीट परीक्षा कोणत्या केंद्रावरून दिली, तेथील संख्येद्वारे घेता येतो.राज्यातील प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित झालेला १ विद्यार्थी मराठवाड्यात येऊन नीटची तयारी केलेला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

  नीट, जेईईच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी लातूर, नांदेडमध्ये येत आहेत. त्याचा मूलाधार शालेय शिक्षण आणि तेथील गुणवत्ता आहे. 

 दहावीचे निकाल पाहिले, तर १०० टक्के गुण मिळविलेल्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ७५ टक्के विद्यार्थी लातूर विभागातील राहिले आहेत. २०२३ मध्ये राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. त्यात लातूरचे १०८ जण आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे २२ विद्यार्थी होते. म्हणजेच जवळपास ८५ टक्के विद्यार्थी मराठवाड्यातील होते.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल