शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाषेचा जांगडगुत्ता

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

नेत्रदीपक हा शब्द चुकीचा आहे असे जर मी म्हटले तर सगळे मराठी भाषाप्रेमी मला मारायला धावतील.

नेत्रदीपक हा शब्द चुकीचा आहे असे जर मी म्हटले तर सगळे मराठी भाषाप्रेमी मला मारायला धावतील. व्याकरणाच्या नियमानुसार नेत्र आणि दीपक या दोन शब्दांची संधी नेत्रोद्दीपक अशी होते पण असे असले तरी गेली किमान पंचवीस वर्षे हा शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिला बोलला जात आहे.एखादी चूक माणूस सतत करायला लागला की तिचे नियमात रूपांतर होते, या न्यायाने हा रोग जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बळावला असून अयोग्य जीवनपद्धती हीच योग्य जीवनपद्धती ठरू लागली आहे. योग्य आणि अयोग्य या शब्दांच्या व्याख्याही सापेक्ष झाल्या आहेत. जगणे आपल्या सोयीच्या अंगाने वळवून आपापल्या इच्छेनुसार प्रत्येकजण कालक्रमणा करीत आहे. जगण्याची दिशा शक्य तेवढी सोपी, बिनकष्टाची आणि मनोरंजनाकडे घेऊन जाणारी आहे. ज्याना याची चिंता वाटते ते म्हणतात, जगण्याचे सुमारीकरण, सपाटीकरण सुरू आहे, चंगळवाद बोकाळला आहे.या परिस्थितीला तोंड देण्याचे दोन मार्ग दिसतात. एक म्हणजे विरोध करून मोडून पडण्याची तयारी ठेवणे किंवा जनांचा प्रवाहो चालला म्हणत त्यात सामील होणे. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांना दोन वेगवेगळे अर्थ आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, हे हिंदीत ठीक आहे पण, ‘गर्व आहे मला मी मराठी असल्याचा’ असे म्हटले की घोटाळा सुरू होतो. तिथे अभिमान हाच शब्द हवा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा नायक एका प्रसंगात छाती ठोकत, हो हो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा असे म्हणतो तेव्हा त्याने आधी मराठी भाषा नीट बोलायला शिकले पाहिजे असा विचार मनात येतो. त्याला अभिमान असे म्हणायचे असावे अशी मनातल्या मनात दुरूस्ती करत सुजाण प्रेक्षक पुढील सिनेमा पाहू लागतो.पीएच.डी.साठी प्रबंध लिहायचा असेल तर एक मोठा कालखंड अभ्यासासाठी घ्यावा लागतो. मराठी भाषेची अधोगती हा विषय ठरला तर फक्त एका दिवसातील चार प्रमुख वृत्तपत्रे तुलनात्मक अभ्यासासाठी खूप झाली. प्रत्येक वृत्तपत्राचे शुद्धलेखन वेगळे. इतकेच काय, एकाच वृत्तपत्रातील प्रत्येक पानावरील शुद्धलेखन वेगवेगळे. आणि विविध चित्रवाहिन्यांवरील मराठी म्हणजे तर संशोधकांची चंगळच.तात्पर्य: मराठी भाषा रोज मरत आहे.ज्यांना हे मान्य नाही त्यांनी थोडासा बदल करून, मराठी भाषा रोज घडत आहे असे म्हणावे.

--प्रल्हाद जाधव