शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मुंबईचा धडा नाशिक घेणार का?

By किरण अग्रवाल | Updated: September 7, 2017 20:12 IST

कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नसते हे खरेच, पण एकदा अशा आपत्तीचा फटका बसून गेला असताना किंवा तोंड पोळले गेल्यावरही त्यापासून काही बोध घेतला गेला नाही तर होणाऱ्या नुकसानीला अगर हालअपेष्टांना निसर्गाइतकेच संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले जाणे स्वाभाविक ठरते.

कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नसते हे खरेच, पण एकदा अशा आपत्तीचा फटका बसून गेला असताना किंवा तोंड पोळले गेल्यावरही त्यापासून काही बोध घेतला गेला नाही तर होणाऱ्या नुकसानीला अगर हालअपेष्टांना निसर्गाइतकेच संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले जाणे स्वाभाविक ठरते. नुकत्याच मुंबईत झालेल्या व तत्पूर्वी नाशकातही बरसून गेलेल्या धुवाधार पावसाचा अनुभव त्याचदृष्टीने, म्हणजे पाऊस पाण्याच्या निचऱ्याच्या संबंधाने महापालिकांच्या यंत्रणांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. २९ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या ‘आभाळफाड’ पावसाने समस्त मुंबईकरांची दाणादाण उडविली. अवघ्या ९ ते १० तासांत सुमारे ३०० मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या या विक्रमी पावसाने २६ जुलै २००५ रोजी झालेल्या जलप्रलयाचीच आठवण करून दिली. मुंबईची लाईफ लाईन म्हणणविणाऱ्या लोकल सेवेबरोबरच रस्ता वाहतूक व विमानसेवाही कोलमडली. पावसामुळे वाहतूक खोळंबल्याने ठिकठिकाणी अडकून पडलेल्या चाकारमान्यांच्या चिंतेने अनेक कुटुंबीय धास्तावलेत. शासकीय कार्यालये, शाळांना सुटी देण्यात आली, पण माणसं-मुलं वेळेत घरी पोहोचू न शकल्याने अनेकांनी जी हृदयाची धडधड अनुभवली ती शब्दात मांडता येऊ नये. या अनुभवातून पुन्हा तोच सनातन प्रश्न उपस्थित झाला, मुंबईतील पाऊस-पाण्याच्या निचऱ्याचे काय? महापालिका नगर नियोजनाबाबत काय करतेय?

मुंबईलगत असलेल्या नाशकातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गेल्या १४ जून रोजी एका तासात तब्बल ९२ मिमी पाऊस झाल्याने नाशिककरांची झोप उडाली होती. नाशिकच्या मध्यवस्तीतून वाहणाºया गोदावरीच्या पुराने अनेकांना फटका दिला. घरातून- दुकानांतून थेट रस्त्यावर आणून ठेवले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता यासंदर्भाने आठवायची तर,

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहूनमाहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचलीभिंत खचली, चूल विझली होते नव्हते नेलेप्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले।

पण निसर्गच कोपला व एवढा पाऊस झाला तर आपण काय करणार? असे म्हणत महापौरांनी हात टेकल्यागत भूमिका प्रदर्षिली. निसर्ग सांगून फटका देत नसतो, पण पूर्वानुभवातून संकेत घेऊन काही उपाय योजले तर या फटक्याची तीव्रता नक्कीच बऱ्यापैकी कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही ही खेदाची बाब आहे. एका तासांत ९२ मिमी पाऊस होत असताना नाशकातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइन्स अवघ्या २७ मिमी क्षमतेच्या असल्याचे यानिमित्ताने लक्षात आले. तेव्हा, निसर्गाचा वाढता लहरीपणा पाहता या पाइपलाइन्सला पर्यायी व्यवस्था करण्याबाबत विचार होणे अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे, असे पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्यावर्षी २ ऑगस्ट २०१६ रोजीही मुसळधार पावसाने व गोदेला आलेल्या पुराने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी थेट लष्कर बोलवावे लागते की काय याची चर्चा करण्याची वेळ आली होती. त्याहीपूर्वी १९ सप्टेंबर २००८ रोजी तर नाशिककरांनी महापूर अनुभवला आहे. त्यावेळी उडालेली दाणादाण आठवली तर आजही जिवाला कापरे भरते. चांदवडकर लेनपर्यंत व प्रसिद्ध सरकारवाड्याच्या नवव्या पायरीपर्यंत तेव्हा पुराचे पाणी आले होते. त्यामुळे पूररेषा निश्चितीचा विषय गाजून काही निर्णयही घेण्यात आले होते. पण पुढे त्याबाबत फारसे गांभीर्य बाळगले गेलेले दिसले नाही. नदीपात्राचे संकुचित होणे सुरूच आहे. साधी नाले सफाई नीट होत नाही, अशा अनेक बाबी आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे, पण ते होत नाही.नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदापात्रातच उभी असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती नाशिककरांसाठी पर्जन्यमापक मानली जाते. ‘दुतोंड्या’ बुडाला की नाशिकच्या गाडगे महाराज पुलाला पाणी लागते व गोदाकाठी दैना उडते. या ‘दुतोंड्या’जवळच असलेल्या नारोशंकराच्या मंदिरातील घंटेला पुराच्या पाण्याने स्पर्श केला तर पुढे चांदोरी, सायखेडा या गावात तसेच कोपरगावच्या बाजारपेठेत पाणी शिरते; असे काही संकेत प्ररस्थापित आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत गोदावरीला चार पूर गेले असून, १४ जून रोजी ‘दुतोंड्या’चे पूर पाण्यात पूर्ण स्नान घडून आले आहे. अशा वेळी वा आपत्ती ज्या ज्यावेळी येते तेव्हा ती टाळण्याबद्दल वांझोटी चर्चा घडून येते व निसर्गापुढे हतबलता व्यक्त करून हात वर करण्याचे प्रकार घडून येतात. त्यामुळे प्रत्येकच वेळी नव्याने संकटाला सामोरे जाण्याची व परीक्षेला बसण्याची वेळ येते. त्या त्यावेळी मुंबईकरांचे ‘टीम स्पीरीट’ जसे दिसून येते तसे नाशकातही ते दिसते. नागरिकच एकमेकांच्या मदतीला धावतात. कोसळलेल्यांना उभारण्याचा हात देतात. पण, यंत्रणा केवळ कागदे नाचवून थांबू पाहतात. तेव्हा, मुंबईत उडालेल्या हाहाकारानेच काय, नाशकातही यापूर्वी घडून गेलेल्या पूरप्रपातातून धडा घेऊन अशा आपत्तीतूनही बचावण्याची व्यवस्था साकारली जाणे गरजेचे आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, पावसाळी गटार योजनेतील उणिवा दूर करणे, पाणी तुंबण्याची ठिकाणे हेरून तेथे विशेष उपाय योजणे, पावसाळी नाल्यांची क्षमता वाढविणे यांसारख्या मुद्द्यांकडे त्यासंदर्भाने लक्ष दिले जावे इतकेच यानिमित्ताने. 

टॅग्स :Mumbaiमुंबई