शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोण हे उल्लू..?

By admin | Updated: March 5, 2017 23:37 IST

विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याने परवा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या उक्तीचा प्रत्यय दिला

विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याने परवा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या उक्तीचा प्रत्यय दिला. तोदेखील सक्रिय राजकारणात ५० वर्षे हयात घालविलेल्या शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर नेत्यासमोर. ह्यतुम्ही सांगाल ते नगरसेवक आम्ही इव्हीएममध्ये फेरफार करून निवडून आणू, अशी आॅफर आपल्याला एकाने दिली होती. त्याचे बिंग फोडण्यासाठी त्याने जेवढे पैसे सांगितले ते मान्य करुन आपण त्याला काही रक्कम अ‍ॅडव्हान्सही दिली, पण दोन दिवसांनी तो माणूस परत आला व आम्ही भाजपाचे काम घेतले आहे, तुमचे करता येणार नाही. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे काम करायचे नाही, अशा सूचना आहेत असे सांगून त्याने घेतलेला अ‍ॅडव्हान्स परत केला, असा स्वानुभव त्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या बैठकीत कथन केला. हे सांगणे म्हणजे संधीअभावी चारित्र्यवान राहण्यासारखे आहे. स्वत:ची मंत्रिपदाची खुर्ची टिकविण्यात ज्यांची कारकीर्द गेली, असे हे नेते यापेक्षा वेगळे काही करू शकत नाहीत. जर त्यांना इव्हीएम मशीनमधील गडबडीचा पर्दाफाश करायचाच होता, तर त्याने आॅफरचे चुपचाप शूटिंग करून घेतले असते, बोलणे टेप केले असते आणि हा सगळा प्रकार भाजपाने केल्याचे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती तर भाजपावर खापर फुटले असते. राजकारणात टगेगिरी आवश्यक असते, असे अजित पवार यांनी यापूर्वी बोलून दाखविले आहे. पण ती न करता, नंतर रडारड करणारे शेंदाड शिपाई राष्ट्रवादीमध्ये पाहून आश्चर्यच वाटते. या माजी मंत्र्याने निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी रचलेली कहाणी यापलीकडे या कथनाला काय म्हणावे? अशा कहाण्या बनवायच्या आणि त्या स्वप्नरंजनात स्वत:सोबत पक्षालाही गुंतवून टाकायचे असे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. अर्थात अशा मोठ्या प्रमाणात अशा गडबडी करता येणे अशक्य आहे, असे स्वत: शरद पवार यांनीच त्या माजी मंत्र्याला सुनावले, हे बरेच झाले. आता त्याने आपली ही लल्लूगिरी बंद करावी आणि खरेच असे काही झाले असेल तर त्याच्या मुळाशी जावे, याच्या कायदेशीर बाबी तपासाव्यात. गरज पडली तर न्यायालयात जावे. पण हे असले स्वप्नरंजन थांबवावे.