शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

कोण कोणता धडा घेणार?

By admin | Updated: March 2, 2017 23:59 IST

राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक निकालापासून कोणी कोणता धडा घ्यावा

राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक निकालापासून कोणी कोणता धडा घ्यावा? खासदार संजय काकडेंची भविष्यवाणी आणि राजकारण याचा नेमका अर्थ कसा लावला जात आहे...राज्यातील १० महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळीने गावोगावी उडालेल्या धुराळ्याने आता जमिनीवर विसावयाला सुरुवात केली आहे. मतांच्या साठमारीत अनेकांच्या पदरात अपयशाचे माप पडले. ज्यांना यश मिळाले त्यांनी त्या मापाचा अर्थ साहजिकच सकारात्मक लावला. अपयश मापाच्या धन्यांपैकी अनेकजण आजही चक्रावलेले दिसतात. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकारणाचा बाज बदलला. त्या बदलाला राजकीय मंडळी कशा पद्धतीने सामोरी गेली व आता जात आहेत हा राजकीय निरीक्षकांच्या अभ्यासाचा विषय ठरावा. पण एकूणच राज्यात झालेल्या महापालिका - जिल्हा परिषद निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेने या विषयाकडे शास्त्रीयदृष्ट्या राजकीय - सामाजिक मानसशास्त्राच्या तराजूत जोखण्याची वेळ आली आहे. मतदार कोणाच्या पारड्यात मते का, कशी आणि कोणत्या निकषावर टाकतो, या विषयाचे विश्लेषण तर्कशास्त्राच्या आधारावर नेहमीच केले जाते. आता ते सामाजिक व राजकीय मनोभूमिकेच्या आधारावरही करावेच लागेल, असा संदेश देणारा हा काळ आहे.या निवडणुकीत कोणाला किती यश मिळाले तसेच मुंबई महापालिकेत आणि राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदांवर कोणाचा झेंडा फडकणार याची चर्चा करण्यासाठी हे लेखन नाही. तर जगातील बलाढ्य लोकशाहीच्या देशातील निवडणूक प्रक्रिया, त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाची भूमिका आणि त्यांना साद-प्रतिसाद घालणाऱ्या सामाजिक घटकांचा विचार झाला पाहिजे. त्याच भूमिकेतून जे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आज उभे राहिलेले आहेत त्या प्रश्नांची आजची चर्चा मनोरंजनाच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येते. भविष्यवाणी हा कोणत्याही निवडणुकीतील मनोरंजनाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या औत्सुक्याचा विषय असतो. ख्यातनाम भविष्यवेत्ते तशी भविष्यवाणी करू लागले तर भविष्यप्रेमी त्याकडे उत्सुकतेने पाहतो. राजकीय नेत्यांच्या भविष्यवाणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या निवडणुकीत मात्र पुण्यातील निकालाचे भविष्य राजकारणातील प्रशिक्षणार्थीने सांगितले आणि ते खरेही ठरले! एका जमान्यात पवार काका-पुतण्यांच्या अष्टरत्नांत गणले जाणारे अजितदादांचे उजवे-डावे समजले जाणारे खासदार संजय काकडे यांनी महापालिकेत निवडून येणाऱ्या सदस्यांचा आकडा मतदानापूर्वीच जाहीर केला आणि तसे न घडल्यास राजकारणातून संन्यास घेण्याची प्रतिज्ञाही केली. ते बोलले तस्सेच घडले ! मग हा योगायोग की पुणेकरांच्या मनात घुसून त्यांचे मत धुंडाळण्याची मनोतंत्र कौशल्याची ‘सिद्धी’ काकडेंना लाभली आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे समर्थक, विरोधक आणि राज्यातील तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य लोकांना आजही सापडलेले नाही. त्या शोधातच आता मतदान यंत्रावरच संशय घेतला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर या विषयावर एरंडाचे गुऱ्हाळही मोठ्या प्रमाणावर चालले. त्यातून मतदान यंत्र घोटाळा होऊ शकत नाही, असा निष्कर्षही अनेकांनी तांत्रिक आधारावर काढला. १९५२ साली स्वतंत्र भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळच्या सर्वच राजकीय पक्षांना आपला प्रचार, मतदान कसे करावे हे सांगण्यासाठी प्रात्यक्षिकासह प्रचार करावा लागला होता. पुढे मतदान अंगवळणी पडले आणि देशात ‘बोगस मतदान’ ही समस्या समोर आली. त्यावरही देशाने बऱ्याचअंशी मात केली. आता मतदान यंत्रांचा जमाना असल्याने काही यंत्रे बिघडू शकतात, संपूर्ण यंत्रणाच बिघडू शकत नाही, असा सप्रमाण विश्वास लोकांना वाटतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक निकालाने कोणाला कोणता धडा दिला हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने उद्योगपतीपासून ते मोलमजुरी करणाऱ्यां- पर्यंतच्या घटकांना झालेला त्रास, शिस्त आणि संयमाचा नवा आदर्श जागतिक पातळीवर पोहोचविलेल्या मराठा मूक मोर्चानंतरही मराठा समाजाच्या पदरी आलेली निराशा, आरक्षण या मुद्द्यांवरून सर्वच जातिधर्मांची झालेली निराशा आणि अशाच अनेक प्रश्नांच्या यादीचा भडिमार असतानाही त्याचा विचार मतदारांनी केला नाही, असाच निष्कर्ष अनेकजण काढतात. पण स्थानिक संदर्भ आणि काहीतरी नवे घडण्याची आशा हेच सूत्र मतदार मांडतो हा धडा आपण का घेत नाही?- राजा माने