शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण म्हणजे काय?

By admin | Updated: August 23, 2016 07:19 IST

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे.

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे. पण आज उच्च शिक्षण घेतलेल्यांच्याही मनावर ताबा नाही. त्यांचे शरीर व मन आजारी आहे म्हणून सध्याचे शिक्षण खरे आहे का, याचा विचार करायला हवा.माणसाला मन, भावना व चेतना असतात. योगशास्त्रानुसार माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच अभिन्न भाग आहेत. त्यांना ‘कोष’ म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.अन्नमयकोष म्हणजे शरीर. तो हाडमांस मज्जारक्तातून बनलेला असतो. तो जिवंत ठेवण्यासाठी अन्न-पाण्याची गरज भासते. प्राणमय कोष प्राणवायूद्वारे जिवंत राहातो. मनोमय कोष म्हणजे भावना, विचार, संवेदना आदिंचे उगमस्थान असलेल्या मनाचा पसारा. विज्ञानमय कोष म्हणजे माणसाच्या चेतनेचा विस्तार. शेवटी आनंदमय कोष म्हणजे शांत व सर्व विकार व उद्वेगांपासून मुक्त असणारे गहनतम व्यक्तिमत्व.या पाच कोषांचा विचार करता, असे लक्षात येते की, ही माणसाची परिपूर्ण व संतुलित कल्पना आहे. अन्नमयकोष भौतिक असून तो बाह्यरुपी आहे. प्राणमयकोष त्यापेक्षा सूक्ष्म व जसजसे आपण व्यक्तिमत्वाच्या आत उतरतो तसतसे तो अधिक सूक्ष्म होत जातोे. म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा फक्त वीस टक्के भाग बाहेर दिसतो तर उरलेला ऐंशी टक्के भाग सूक्ष्म असल्याने नजरेच्या पलीकडे असतो.सध्याचे शिक्षण केवळ या फक्त वीस टक्के भागाची काळजी घेते. ऐंशी टक्के भाग दुर्लक्षित व उपेक्षित राहातो. म्हणून आजचा माणूस शरीराने पुष्ट असून सुध्दा अंत:शक्तिने हीन, मनाने व्यग्र, विचाराने आत्मकेन्द्रीत व व्यवहाराने असंतुलीत झाला आहे. शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुध्दिसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवनकलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय