शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काळाच्या गरजेनुसार हवामानाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:15 IST

हवामान बदलाचे आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता

शुभांगी भुतेहवामान बदलाचे आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच आरोग्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींची वाढलेली संख्या हे त्याचेच द्योतक आहे. जसे मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा भाग आणि संपूर्ण विदर्भाला उन्हाळ्यात तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागत आहे. कोकणसुद्धा हवामान बदलाच्या तावडीतून सुटलेले नाही. अगदी अलीकडे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईला उष्ण लहरींचा इशारा द्यावा लागला होता, ही त्याची चुणूक आहे.पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यात वातावरण, हिम आणि नद्या, तसेच महासागर, इतर जलयंत्रणा अनेक सजीव यांची महत्त्वाची भूमिका असते. या संपूर्ण हवामान प्रणालीला ऊर्जा पुरविण्याचे कार्य सूर्य करत असतो. मात्र, सूर्याच्या सरळ येत असलेल्या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूच्या पडद्यामुळे होत असते. मात्र, वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरणामुळे, पर्यावरणाच्या वाढत्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच हवामान बदल आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानापैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम अन्न उत्त्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच आरोग्य या संस्थावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींची वारंवारता वाढली आहे. जसे मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा भाग आणि संपूर्ण विदर्भाला उन्हाळ्यात तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागत आहे. तीव्र उष्ण लहरी केवळ २-३/४-५ दिवसांपर्यंत मर्यादित न राहता, आता ती प्रदीर्घ काळ १०-१५ दिवस अनुभवायला लागली आहे. हिवाळ्यात अती शीत लहरींची वारंवारता आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ, जेथे उष्ण लहरींसाठी चेतावणी द्यावी लागते. हाच हवामानातील बदल आहे. कोकणसुद्धा हवामान बदलाच्या तावडीतून संरक्षित आहे, असे नाही. अगदी अलीकडे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला कोकणात अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईलासुद्धा उष्ण लहरींसाठी चेतावणी द्यावी लागली; कारण आपल्याला किमान तापमानात घट होणे अपेक्षित असते. पावसाळ्यातील तर पॅटर्न बदललाच आहे. सर्वसाधारण पावसाळ्याची सुरुवात दमदार पावसाने होऊन, दीर्घ काळ कोरड कालावधी दोन-तीन आठवड्यांचा असतो. त्यानंतर, आपण शेतीसाठी पेरणीची तयारी करतो; जुलैमध्येसुद्धा असेच फेरबदल दिसले आहेत. आॅगस्ट महिना जो कधी पावसासाठी गणला जातो, तेव्हाच मुसळधार किंवा अतिवृष्टी होते. हाच बदल आहे आणि आपण तो स्वीकारला आहे.आपण आता पिकांचे पॅटर्न बदलत आहोत आणि तेच नियोजित करत आहोत. या सगळ्यात बदलत्या हवामानाचे अंदाज देण्याची पद्धतसुद्धा बदललेली आहे. आता भारतीय हवामान विभागसुद्धा काळाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी पूर्वानुमान वर्तविते. जसे नाऊ कास्टिंग म्हणजे वर्तमान अंदाज (४-५ तासांसाठी). ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी, वादळाची सूचना, अतिवृष्टीची सूचना, व्हॅलिडिटीसुद्धा सांगितली जाते. शहरासाठी पूर्वानुमान यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी आणि दोन दिवसांचे अंदाज आणि शक्यता सांगितलेली असते. जिल्हानिहाय पूर्वानुमानामध्ये पुढील दिवसांसाठी उपविभागीय शक्यता सांगितली जाते. या सगळ्यामध्ये दीर्घकालीन ऋतू पूर्वानुमान आणि विस्तारित दीर्घकालीन पूर्वानुमान पावसाळा/मान्सून ऋतुसाठी अंत्यत महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन पूर्वानुमान स्टेज वनमध्ये पावसाळ्याचे अंदाज असतात. ज्यामध्ये पावसाळा कसा राहील, सरासरी/सरासरीपेक्षा जास्त/खूप जास्त किंवा सरासरीपेक्षा कमी हे विस्तारितरीत्या नमूद केलेले असते. स्टेज दोनमध्ये मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार, याचा अंदाज असतो. तर स्टेज तीनमध्ये जून-सप्टेंबरदरम्यान पाऊस कसा असेल हे असते. विस्तारित पूर्वानुमान प्रत्येक गुरुवारी पुढील चार आठवड्याचे पावसाचे, तापमानाचे सरासरी चित्र असते. यामुळे कृषिसंबंधित नियोजनासाठी अत्यंत उपयोगी आहे. बदलत्या काळानुसार पूर्वानुमानसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाठविले जातात. जसे एसएमएस, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, वेबसाइट आणि ई-मेलद्वारे नोंदणीकृत सदस्यांना पाठविले जातात. यामध्ये संपूर्ण रेल्वेचे मुख्य नोंदणीकृत अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, एनडीआरएफ, मच्छीमार, ऊर्जाक्षेत्र आणि आर्मी, नेव्हीलासुद्ध पाठविले जातात, तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाससुद्धा थंडरस्टॉर्म वॉर्निंग पाठविल्या जातात. हे सगळे अंदाज/पूर्वानुमान देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जसे विविध सॅटेलाइट प्रोडक्ट, डॉप्लर वेदर रडार प्रोडक्ट, सिनेर्जी प्रोडक्ट, जमिनीवरची निरीक्षणे, उच्च स्तरावरील निरीक्षणे याचा उपयोग केला जातो. या सगळ्यामध्ये न्युमिरिकल वेदर प्रेडिक्शन मॉड्यूल खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणारे अन्य हवामान वातावरणासंबंधी काम करत असलेल्या कार्यालयांच्या एकत्रित प्रयत्नाने पावसाचा अंदाज वर्तविण्यात यश येत आहे. काही वर्षांपूर्वी पूर्वानुमान, केवळ २४, ४८, ७२ तासांसाठी दिले जात होते. मात्र, आता काळाच्या गरजेनुसार विविध कालावधीसाठी दिले जाते.