शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आपण सगळेच करंटे; पंढरपूरला विसरलो! 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घडलेली महत्वाची घटना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 08:17 IST

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले, त्या घटनेला आज (१० मे) रोजी ७५ वर्षे पूर्ण होताहेत; पण ‘भोंग्याच्या गोंगाटात’ पंढरपूरची आठवण कशी येणार?

- सुधीर लंके, आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगरsudhir.lanke@lokmat.com

सध्या मंदिर-मशिदींवरील भोंग्यांची चर्चा आहे. या चर्चेचा गोंगाट इतका आहे की, त्यातूनच कानठळ्या बसाव्यात. पण या सर्व गदारोळात महाराष्ट्र एक मोठी सामाजिक क्रांतीची घटनाच विसरला आहे, असे दिसते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले, त्या घटनेला आज (१० मे) रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण होताहेत, पण या समतेच्या लढाईची आज ना शासन दखल घेतेय ना जनता. 

पंढरपूरच्या वाळवंटात भेदभाव व शिवाशीव का? विठ्ठलाचे दरवाजे हरिजनांसाठी खुले का नाहीत? असा प्रश्न करत साने गुरुजींनी पंढपुरात १ ते १० मे १९४७ दरम्यान उपोषण केले होते. तोवर हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. हरिजनांसाठी गांधीजींनी १९३२ साली उपवास केला होता. परंतु, त्यातून सर्वच मंदिरे व विहिरी खुल्या झाल्या नव्हत्या. 

विठ्ठल मंदिर खुले व्हावे, यासाठीचे लोकमत तयार करण्यासाठी गुरुजींनी राज्यभर दौरा केला. ७ जानेवारी १९४७ रोजी मुंबईतून त्याची सुरूवात झाली. सेनापती बापट, प्रा. वसंत बापटांच्या नेतृत्वाखाली कलापथकही सोबत होते. साने गुरुजींचे ‘घ्या रे हरिजन घरात घ्या रे’, पु. ल. देशपांडे यांचे ‘हरिचे प्यारे हरिजन आम्ही’ तर बा. भ. बोरकरांच्या ‘पंढरीस वाजे घंटा, पांडुरंग झाला जागा’ या गीतांनी त्यावेळी राज्य ढवळून निघाले. मंदिर खुले व्हावे म्हणून पाच लाख स्वाक्षऱ्या जमल्या. सोबतच या प्रबोधनातून गावोगावची अनेक मंदिरे, विहिरी दलितांसाठी खुल्या झाल्या. एस. एम. जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे, तुकडोजी महाराज, राजा मंगळवेढेकर अशी अनेक माणसे या मंदिर लढाईत सामील होती. नाना पाटलांनी तर त्यावेळी सर्व समाजाला जाहीर प्रश्न केला, ‘अरे, तुमच्या उपेगाला येत्यात, कामाला धावत्यात, त्यांनाच तुम्ही लांब ठेवता. इटाळ, चंडाळ मान्ता. काय म्हणावं तुम्हाला?’ 

दौरा होऊनही बडवे मंदिर प्रवेशास संमती देत नसल्याने १ मे रोजी पंढपुरात उपोषण सुरू झाले. ‘जावो साने सीनापार, नही खुलेगा विठ्ठलद्वार’ असा पलटवार त्यावेळी पंढपुरातून झाला. उपोषणाला जागा उपलब्ध होत नव्हती. राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे यांनी आपल्या मठात ती दिली. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेले तनपुरे हे गाडगेबाबांचे शिष्य. त्यामुळे ते निडरपणे गुरुजींसोबत आले. त्यावेळी हे धाडसच होते. आजगावकर व सातारकर मठ, ‘गोफण’कार तात्या डिंगरे, गोविंदकर ही स्थानिक मंडळी गुरुजींसोबत होती. तत्कालीन मध्यवर्ती कायदे मंडळाचे स्पीकर दादासाहेब मावळंकर यांनी बडवे मंडळींना राजी केले व १० मे रोजी मंदिर खुले करण्याचा निर्णय झाल्यानंतर हे उपोषण थांबले. पुढे राज्यात तसा कायदाही झाला. 

या उपोषणाबाबत महात्मा गांधींजींचाही गैरसमज तयार केला होता. त्यामुळे ते उपोषणाच्या विरोधात होते. त्यावेळी मुंबई असेंब्लीत हरिजन मंदिर प्रवेशाचे बिल आले होते. कायदा होणारच आहे तर उपोषणाची घाई कशाला, अशी गांधींची भूमिका होती. मंदिर प्रवेशाचे श्रेय साने गुरुजींना जाईल म्हणून काॅंग्रेसही सोबत नव्हती.  विठ्ठल मंदिरातील भेदभाव संपणे ही एक सामाजिक क्रांती होती. पण, या लढ्याची राज्याने उपेक्षा केली. साने गुरुजींना पंढरपुराने आजही स्वीकारलेले दिसत नाही. त्यांचा साधा पुतळादेखील तेथे नाही. या लढ्याची कुठलीच खूणही नाही. तनपुरे महाराज मठाचे सध्याचे प्रमुख बद्रीनाथ महाराज यांनी याच मठात गुरुजींच्या स्मारकासाठी जागा दिली आहे. साने गुरुजी मंदिर सत्याग्रह स्मारक समितीकडून तेथे आता छोटेखानी स्मारक उभे राहतेय. पुन्हा एकदा हा मठच गुरुजींसाठी धावला. अर्थात तनपुरे महाराजांनाही राज्याने उपेक्षितच ठेवले. राष्ट्र सेवा दलाचा सामाजिक सद्भाव सप्ताह वगळता सर्व महाराष्ट्र सध्या ‘मनसे’च्या भोंगा आंदोलनात गुंग आहे. या गोंगाटात पंढरपूरची आठवण कशी येणार?

टॅग्स :Pandharpurपंढरपूर