शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिवचिवणारी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 06:38 IST

शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़

शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़ पुन्हा पुन्हा ओठी येतात, गुणगुणावाश्या वाटतात़ असे का व्हावे? कारण त्या कवितांनी एक संस्कार दिलेला असतो़ कवितेचा नित्य नवा अर्थ लागत जातो़ जीवाला बरे वाटते़ आपणच आपल्या मनाशी संवाद करत असतो़ कवितांची ही देन सुखावह वाटते़ उतारवयातील विस्मरणाच्या स्पर्धेत कविता मात्र स्मरणात राहातात़ नवा अनुभव देतात़ विंदा करंदीकरांची, ‘चिवचिवणारी वाट असावी दमछाटीची यावी घाटी घाटीनंतर गडग्यापाशी पार असावा बसण्यासाठी’ ही कविता अचानक ओठी आली आणि भुर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्यांचा थवा नजरेपुढती आला़ ‘चिव चिव ये, दाणा खा पाणी पी, भुर्र उडून जा’ चिमणीला ना दाणा दिला, ना पाणी पाजले़ नातवंडांचे रडे थांबवायला मात्र चिऊ आणि काऊच लागतात़ त्यांना खेळवता खेळवता आपणच खेळत असतो़ चिऊ-काऊच्या गोष्टीतील एकाक्ष कावळ्याचा तिरस्कार बालपणीच मुलांना आपण शिकवतो़ त्याचे घर शेणाचे, पावसात वाहून जाणारे़ त्याला चिमणीच्याच दारी यावे लागते़ दार उघड, म्हणून केवढा तगादा चिमणीकडे लावतो़ चिमणी मात्र आपल्या बाळाचे सर्व काम पूर्ण करते, मगच कावळ्याला घरात घेते़ लहानपणी चिमणी कळलीच नाही़ आजोबा झाल्यावर नातवंडांना खेळवताना समजली़ संसारावर प्रेम करणारी, लेकरांचं कौतुक करणारी, आल्यागेल्यांना आश्रय देणारी़ वारे! चिमणी़ आपलाही संसार चिमणीसारखाच असतो़ आपले चिमणी आणि चिमणराव भुर्रकन उडून जातात ते पंखात बळ आल्यावऱ आपण मात्र त्यांच्या आठवणी काढून असहाय्यपणे जगत राहातो़ धुवाधार पाऊस सुरू झाला़ अनेक घरांची पडझड पाहिली की वाटते चिमणी किती हुशार. मेणाचे घर बांधते तिचा संसार सुखाचा संसाऱ पोराबाळांचे करता आले, दारी आलेल्या अतिथीची सोय करता आली म्हणजे झाले़ कावळ्याला घरात घेणारी चिमणी पोपटाचे निमंत्रण धुडकावते़ सोन्याच्या पिंजऱ्यात राहायला, बोलावणाऱ्या पोपटाला स्वाभिमानी चिमणी खडे बोल सुनावते़‘जळो तुझा पिंजरा मेलाचिमणी उडून गेली राना’ स्वातंत्र्यावर प्रेम करणारी, कोणत्याही आमिषाला न भुलणारी, बंधन झुगारणारी, स्वत:च्या संसारावर निरतिशय प्रेम करणारी चिमणी कदाचित म्हणतही असेल, ‘संसार हा सुखाचा मी अमृतात नाहते’ झाडे गेली, वेली गेल्या, चिमण्या राहणार कोठे आणि घरी येणार तरी कशा? चिमण्या आल्या पाहिजेत़ चिवचिवाट कानी पडला पाहिजे़-डॉ.गोविंद काळे