शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

थायरॉइडचे आजार हायपोथायरॉइडिअम

By admin | Updated: April 10, 2016 02:24 IST

सर्वसाधारणत: थायरॉइडच्या आजारात वजन वाढते हा एक समज समाजात प्रचलित आहे. म्हणून हल्ली कित्येक स्त्री-पुरुष वजन वाढत असल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतात.

- डॉ. व्यंकटेश शिवणेसर्वसाधारणत: थायरॉइडच्या आजारात वजन वाढते हा एक समज समाजात प्रचलित आहे. म्हणून हल्ली कित्येक स्त्री-पुरुष वजन वाढत असल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतात.वजन ज्या थायरॉइडच्या आजारात वाढते तो आजार म्हणजे हायपोथारॉइडिअम. या आजारात आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमधून पुरेशा मात्रेमध्ये थायरॉइडचा हार्मोन तयार होत नाही. हा हार्मोन शरीराच्या सर्वांगीण चयापचयासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या एकंदरीत चयापचयाचा वेग हा थायरॉइडवर अवलंबून असतो.हायपोथायरॉइडमध्ये शरीराच्या ऊर्जेचा क्षय कमी प्रमाणात किंवा कमी गतीने होते. थायरॉइडच्या एकंदरी रुग्णांपैकी साधारणत: ६० - ७० टक्के रुग्णांना हायपोथायरॉइडचा आजार असतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषापेक्षा ४ ते ५ पटीने अधिक असतो.हायपोथायरॉइडिअम व गरोदरपणागरोदरपणात हायपोथायरॉइडिअमच्या रुग्णांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे किंवा थायरॉइड स्पेशालिस्टकडे जाऊन तपासणी करावी. कारण मातेच्या थायरॉइड पातळीवर जन्माला येणाऱ्या बाळाचा बुद्ध्यांक (आयक्यू) अवलंबून असतो. गरोदरपणात थायरॉइडच्या गोळ्यांचा डोस अधिक मात्रेमध्ये घ्यावा लागतो व दर ४ ते ६ आठवड्यांनी याची तपासणी आवश्यक असते. हायपोथायरॉइड असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.निदानहायपोथायरॉइडचे निदान रक्तातील थायरॉइडच्या तपासणीने होते. यात टी३, टी४, एफटी३, एफटी४ या हार्मोनची पातळी नॉर्मल वा कमी होते. टीएसएच या हार्मोनची पातळी प्रमाणापेक्षा वाढलेली असते. सोबतच डॉक्टर थायरॉइडच्या एन्टीबॉडीची तपासणी करतात. जी वाढलेली किंवा नॉर्मल असू शकते.उपचारहायपोथारॉइडचा उपचार अत्यंत सोपा आहे. डॉक्टर या आजाराचे निदान झाल्यावर तुम्हाला थायरॉक्झीनची गोळी देतात. ही गोळी पुरेशा मात्रेमध्ये दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावी व गोळी घेतल्यावर कमीत कमी एक तास काही खाऊ किंवा पिऊ नये.हायपोथायरॉइडची इतर कारणेथायरॉइडची शस्त्रक्रिया केल्यामुळे, रेडिओ अ‍ॅक्टिव आयोडिनचा डोस घेतल्यामुळे, हायपोथायरॉइडच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे, अ‍ॅमिओडासेनसारख्या गोळ्यांमुळे.हायपोथायरॉइडची लक्षणे१. सुस्ती येणे, डोळ्यावर नेहमी झापड येणे२. वजन वाढणे.३. बद्धकोष्ठता४. पायांना व चेहऱ्याला सूज येणे५. थायरॉइडच्या ग्रंथीवर सूज येणे६. मासिक पाळी अनियमित येणे७. वंशत्व (स्त्रियांमध्ये)८. थंडी सहन न होणे९. त्वचा कोरडी व थंड होणे१०. केस गळणे इत्यादी.बहुतांशरीत्या हायपोथायरॉइडचा आजार हा ं४३ङ्म्रे४ल्ली गटात मोडतो. कित्येक वेळा तो तपासणीमध्ये थायरॉइड आहे हे निष्पन्न होते किंवा रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळत नाही. हायपोथायरॉइडची इतर कारणेथायरॉइडची शस्त्रक्रिया केल्यामुळे, रेडिओ अ‍ॅक्टिव आयोडिनचा डोस घेतल्यामुळे, हायपरथायरॉइडच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे, अ‍ॅमिओडासेनसारख्या गोळ्यामुळेहायपोथायरॉइडचे दुष्परिणामजर आपली थायरॉइडची पातळी पुरेशा मात्रेमध्ये नियंत्रणात नसेल तर रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण, रक्तदाबाचे प्रमाण वाढू शकते. यासाठी स्वत:च्या मनाने निर्णय न घेता तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य त्या मात्रेमध्ये थॉयरॉक्झीनच्या गोळ्या घ्याव्यात.समज व गैरसमजबहुतांशरीत्या या आजारामध्ये थायरॉक्झीनची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते. यामुळेच हायपोथायरॉइडचे रुग्ण जास्त घाबरून जातात. पण हा आजार अगदी सोपा आहे. एकदा टीएसएचची पातळी नॉर्मल आली तरी गोळी चालू ठेवावी लागते आणि सहा महिन्यांनी किंवा किमान वर्षातून एक वेळा थायरॉइडची तपासणी करावी.कित्येक लोकांच्या मनात या हायपोथायरॉइडविषयी यामुळेच गैरसमज निर्माण होतात. आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल. म्हणजे खूप गंभीर आजार आहे की काय ही भावना पण मनात रुजते. विशेषकरून स्त्रियांमध्ये किंवा लग्न न झालेल्या मुलीमध्ये ही धास्ती जास्त प्रमाणात दिसून येते.वरील कारणातदेखील इलाज करणे आवश्यक असते व तुमचे तज्ज्ञ डॉक्टर याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. एकंदरीत समाजामध्ये आजही थायरॉइडच्या आजाराविषयी खूप साऱ्या गैरसमुजती व अज्ञान आहे. लोकांमध्ये इतर आजारांसारखी थायरॉइडची जनजागृती करणे आवश्यक आहे.